आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद:अश्वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन; कोविडपश्चातच्या औषधांबाबत करार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्वगंधापासून तयार आयुर्वेदिक औषधांचा कोरोना रुग्णांना पोस्ट व लाँग कोविडमध्ये चांगला लाभ झाला. भारतात विविध अभ्यासात हे सिद्ध झाले आहे. भारतातील यशानंतर यावर आता प्रथमच भारताबाहेर अभ्यास होणार आहे. यासाठी भारत व ब्रिटन यांच्यात एक करार झाला आहे.

१६ महिने आणि १००हून अधिक बैठकांनंतर आयुष मंत्रालयाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) आणि ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने या औषधावर ब्रिटनच्या तीन शहरांत कोविड रुग्णांवर चाचणी घेऊन अभ्यास करण्याचे ठरवले आहे. एआयआयएचे संचालक आणि प्रकल्पातील सहसंयोजक डॉ. तनुजा मनोज नेसारी म्हणाल्या, येत्या ९० दिवसांत ब्रिटनमध्ये लिसेस्टर, बर्मिंगहॅम आणि लंडनमध्ये अशा दोन हजार रुग्णांवर एक हजारांचा एक याप्रमाणे दोन गटांत हा अभ्यास केला जाईल. नंतर ९० दिवस तुलनात्मक अभ्यास होईल. डॉ. नेसारी म्हणाल्या, भारतात अश्वगंधाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कोविडची दीर्घकालीन लक्षणे कमी करण्यात याचा चांगला परिणाम होत असल्याने कोविडच्या उपचारांत हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...