आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Research On Corona 1st And 2nd Wave Males Hospitalized For Covid 19 Treatment Younger And Death Rate Increased From Pandemic​​​​​​​; News And Live Updates

कोरोनाच्या दोन्ही लाटेवर संशोधन:पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कमी पुरुष रुग्णालयात दाखल - अहवालात दावा, रुग्णालयातील मृत्यूंमध्ये 3.1% वाढ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • दुसऱ्या लाटेत तरुण मोठ्या प्रमाणात संक्रमित

कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने भारतासह संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कोरोनाच्या या दोन्ही लाटेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कमी पुरुष रुग्णालयात दाखल झाले होते असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. त्यासोबतच या कालावधीत रुग्णालयांतील मृत्यूंच्या आकडेवारीत 3.1 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा सर्वे देशात दुसरी लाट सुरु झाल्यापासून तर 11 मेपर्यंत करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या दोन्ही लाटेदरम्यान, रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या क्लिनिकल प्रोफाइलवरुन हा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे स्टडी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (NCDC) तज्ञांनी केले आहे.

दुसऱ्या लाटेत तरुण मोठ्या प्रमाणात संक्रमित
अहवालानुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत देशातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित झाले होते. रुग्णालयात भरती होणाऱ्या 70 टक्के रुग्णांचे वय हे 40 पेक्षा जास्त होते. हा डेटा नॅशनल क्लिनिकल रेजिस्ट्रीमधून घेण्यात आला असून यामध्ये देशातील 41 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला होता.

या अहवालात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा डेटा 1 सप्टेंबर ते 31 जानेवारी 2020 पर्यंत घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या लाटेचा डेटा 1 फेब्रुवारी ते 11 मे 2021 दरम्यान घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

संशोधनातून हे समोर आले आहे

 • दुसर्‍या लाटेत 20 वर्षांखालील लोक वगळता सर्व वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
 • दुसर्‍या लाटेत 20 वर्षांखालील आणि 20-39 वयोगटातील लोकांना सर्वात जास्त रुग्णालयात दाखल केले गेले.
 • कोरोनाच्या दोन्ही लाटेत संसर्ग झालेल्यांमध्ये सामान्य लक्षण हे ताप होते.
 • दुसर्‍या लाटेत श्वासोच्छवासाची समस्या सर्वात जास्त होती.
 • या लाटेत ऑक्सिजन आणि मॅकेनिकल व्हेंटिलेशनची सर्वात जास्त गरज पडली.
 • कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ज्या तरुणांना आधी कोणताच रोग नव्हता ते तरुण मोठ‌्या प्रमाणावर कोरोनाबाधीत झाले.
बातम्या आणखी आहेत...