आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Research On The Spectrum Of Mantras At IIT, Also A Study Project On Ramayana Answering System | Marathi News

मंत्रांचे ध्वनी स्पेक्ट्रम:आयआयटीमध्ये मंत्रध्वनीच्या स्पेक्ट्रमचे संशोधन, रामायण आन्सरिंग सिस्टिमवरही अभ्यास प्रकल्प

नवी दिल्ली / अनिरुद्ध शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एआयसीटीईची देशातील आयआयटीच्या वेगवेगळ्या 15 संशोधनास परवानगी

मंत्रांचे ध्वनी स्पेक्ट्रम काय आहे? आणि यंत्रांचा भूमितीय पॅटर्नशी संबंध काय? शास्त्रीय रागांचा माणसाच्या वर्तनावर काय परिणाम होतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आयआयटी कानपूरद्वारे केला जाणार आहे. पंधरा संशोधनांमध्ये या काही विषयांचा समावेश आहे. या संशोधनासाठी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ही संस्था निधी उपलब्ध करून देईल.

मंत्र-यंत्रासंबंधीचे संशोधन आयआयटी कानपूरचे प्रो. अनुराग त्रिपाठी, शास्त्रीय रागांवर संशोधन डॉ. लक्ष्मीधर बेहेरा करतील. संस्कृत शब्दक्रम, संस्कृत ट्रान्सलेटर-अॅक्सेसर यावर आयआयटी रुरकीच्या विषयांवर हैदराबाद विद्यापीठात संशोधन होणार आहे. आयआयटी रुरकीमध्ये भारतीय वास्तुशास्त्रानुसार शहरांचा प्रोटोटाइप विकसित केला जाणार आहे. आयआयटी मुंबई भगवान शिवाच्या पंचमहाभूत स्थळ मंदिराच्या कुंडाशी संबंधित प्राचीन ज्ञानाची व्याख्या करतील. आयआयटी धारवाडमध्ये इकोफ्रेंडली पारंपरिक महत्त्वाच्या प्राचीन भारतीय माती, सिरॅमिक मूर्ती, भांड्याच्या साह्याने तयार झालेल्या थ्री-डी प्रिंटिंगच्या साह्याने पुन्हा साकारण्यासाठी संशोधन केले जाणार आहे. आयआयटी कानपूरचे प्रो. अर्णब भट्टाचार्य यांनी संशोधनाचा प्रस्ताव मांडला आहे. रामायणासाठी स्वयंचलित प्रश्नोत्तरे व्यवस्था विकसित करण्याची त्यांची संकल्पना आहे. आयआयटी वाराणसीच्या डॉ. सुखदा नीतीशास्त्र व आधुनिकता यावर संशोधन करतील. त्याच महाविद्यालयातील डॉ. व्ही. रामनाथन प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या रसायनशास्त्रातून मिनरल अॅसिडचा शोध घेतील.

भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा संशोधनातून वेध
एआयसीटीईचे अध्यक्ष प्रो. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, पारंपरिक ज्ञानाशी संबंधित संशोधन कार्यासाठी कौन्सिलला जवळपास १५० प्रस्ताव मिळाले होते. त्यापैकी मंजूर १५ संशोधन प्रस्तावास पुढील दोन वर्षांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये मिळतील.

बातम्या आणखी आहेत...