आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:निवडणुकांतील ओबीसींचे आरक्षण; 17 ला सुनावणी, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाची सुनावणी

आरक्षणएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत ओबीसींसाठी राखीव जागा ओपनसाठी खुल्या करण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्ट १७ जानेवारीला सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी सांगितले की, केंद्राच्या अर्जानंतर १७ जानेवारीला सुनावणी केली जाईल.

केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयाला १७ डिसेंबरचा आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. त्या आदेशात कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींसाठी राखीव जागांवरील निवडणूक प्रक्रिया थांबवून तेथे खुल्या प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे आदेश मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते.

न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार यांच्या पीठाने सांगितले की, हे प्रकरण १७ जानेवारीला सुनावणीसाठी समोर येईल. मध्य प्रदेशच्या प्रकरणात याचिका दाखल करणाऱ्या एका अधिवक्त्याने कोर्टाला सांगितले हाेते की, ज्या अध्यादेशाविरुद्ध आपण याचिका दाखल केली होती, तो सरकारने मागे घेतला आहे. त्यावर सर्व प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...