आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय रिझर्व्ह बॅंक:भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा इशारा, ऑनलाईन नोकऱ्यांच्या फसवणुकीत अडकलात तर होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाईन नोरकरीच्या फसवणूकीबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरिकांना शाहणे केले आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नोकऱ्यांच्या घोटाळ्यांना बळी पडू नका असा इशारा दिला आहे. सर्वसामान्य नागरिकाला फसवण्यासाठी हे भामटे लोक वेगवेगळ्या पद्धतांचा वापर करतात. बदलत्या तंत्रज्ञामुळे अलिकडच्या काळात ऑनलाईन पेमेंट पद्धती सुरू झाल्या. दरम्यान कोरोनाच्या काळात या डिजिटल पेमेंट ला आणखी चालना मिळाली.

तसेच आर्थिक व्यवहार करण्याच्या गतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे, किरकोळ व्यवहारांमध्ये नोंदवलेल्या फसवणुकीच्या संख्येतही वाढ झाली आहे, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. आरबीआयने सर्वसामान्यांना ऑनलाइन जॉब फसवणुकीचे स्वरूप आणि कोणत्याही नोकरीच्या ऑफरसाठी अर्ज करताना खबरदारी घ्यायची, मग ती भारतात असो किंवा परदेशात, असे भारतीय रिझर्व्ह बॅकेने नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑनलाइन नोकरी फसवणूकीबाबत, अशी करावी शिकार

  • >> सेंट्रल बँकेने म्हटले आहे की, फसवणूक करणारे बनावट जॉब सर्च वेबसाइट्स तयार करतात आणि जेव्हा नोकरी शोधणारे त्यांची बँक खाती, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डे या वेबसाइट्सवर नोंदणीदरम्यान सुरक्षित ओळखपत्रे शेअर करतात तेव्हा त्यांच्या खात्यांशी तडजोड केली जाते.
  • फसवणूक करणारे एका नामांकित कंपनीचे अधिकारी असल्याचा छडा लावतात आणि खोट्या मुलाखती घेऊन नोकरी देतात. त्यानंतर नोकरी शोधणाऱ्याला नोंदणी, अनिवार्य प्रशिक्षण कार्यक्रम, लॅपटॉप इत्यादीसाठी पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले जाते.

अशी घ्या काळजी

  • >> विदेशी संस्थांसह कोणत्याही नोकरीच्या ऑफरपूर्वी, नोकरी देणाऱ्या कंपनीची, तिच्या प्रतिनिधीची ओळख आणि संपर्क तपशील सत्यापित करा.
  • नेहमी लक्षात ठेवा की अस्सल जॉब ऑफर कंपनी जॉब ऑफरसाठी कधीही पैसे मागणार नाही.
  • अनोळखी जॉब सर्च वेबसाइटवर पैसे देऊ नका.
  • आरबीआयने फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरल्या जाणार्‍या सामान्य पद्धतींवर एक पुस्तिका काढली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेने अलीकडेच फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरल्या जाणार्‍या सामान्य पद्धती आणि विविध उपक्रम राबवताना घ्यावयाची खबरदारी यावर 'BE(A)WARE'या नावाची प्रसिद्ध पुस्तिका तयार केली आहे.
बातम्या आणखी आहेत...