आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Resolve To ' Dirt Leave India', Campaign Till Independence Day; Prime Minister's Appeal

मोदींचा नवा नारा:‘गंदगी भारत छोडो’चा संकल्प करा, स्वातंत्र्य दिनापर्यंत अभियान राबवा; पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • गांधीजींच्या ‘भारत छोडो’प्रमाणे दिला नवा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात केलेल्या भारत छोडो आंदोलनाच्या ७८ व्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत राजघाटावर राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे (आरएसके) उद्घाटन केले. महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांविरोधात दिलेल्या ‘भारत छोडो’ नाऱ्याप्रमाणे मोदींनीही ‘गंदगी भारत छोडो’चो नारा दिला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात भारत छोडो आंदोलन छेडले होते. याचप्रमाणे आपल्यालाही गंदगी भारत छोडो अभियान राबवायचे आहे. यामुळे गंदगी भारत छोडोचा संकल्प करत स्वातंत्र्य दिनापर्यंत हे अभियान राबवण्याचे आवाहन मोदींनी केले. पंतप्रधान मोदींनी ३६ विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरेही केली.

कोरोनाविरोधातील लढाईत स्वच्छ भारत अभियानाच्या योगदानाबाबत मोदी म्हणाले, भारतातील ६० टक्के लोकसंख्येला उघड्यावर शौचास बसावे लागायचे तेव्हा लॉकडाऊन शक्य झाला असता का? स्वच्छतेच्या सवयीचा कोरोनाविरोधातील लढाईत मोठा फायदा झाला. हे निरंतर सुरू राहील.

बातम्या आणखी आहेत...