आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंकिता हत्याकांड:रिसाॅर्टवर 4 जणांना सर्व्हिस देण्यासाठी दबाव, पण अंकिता झुकली नाही; कर्मचाऱ्याने सांगितली हकिगत

मनमीत । डेहराडून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडच्या वनंतरा रिसाॅर्टशी संबंधित अंकिता हत्याकांडात आणखी एक माहिती उजेडात आली आहे. हत्याकांडापूर्वी चार व्हीआयपी कारने रिसाॅर्टमध्ये आले हाेते. या चार पाहुण्यांसाठीच मुख्य आराेपी पुलकितसह इतर दाेघे अंकितावर दबाव टाकत हाेते. परंतु दबावापुढे झुकत नसल्याचे पाहून अंकिताची हत्या करण्यात आली. आता पाेलिस या चार पाहुण्यांच्या शाेधात आहे.

रिसाॅर्टचा कर्मचारी अभिनव म्हणाला, हत्याकांडाच्या दिवशी दुपारी दाेन काळ्या लक्झरी कार रिसाॅर्टमध्ये आल्या हाेत्या. त्यात तरुण हाेते. त्यांचे वय ३४ च्या आसपास असावे. यापूर्वी देखील ते एकदा आले हाेते. तेव्हाही अंकिता व पुलकितचे भांडण झाले हाेते. अभिनव म्हणाला, चारही लाेक १८ सप्टेंबरला पुन्हा आले हाेते. तेव्हा मी त्यांचे कारमधील सामान खाेलीत नेत हाेताे. तेव्हा वरच्या मजल्यावरून मी पाहिले. अंकिता मॅडम रडत हाेत्या आणि माझी अब्रू वाचवा, असे ओरडत हाेत्या. तेव्हा आतून पुलकित आला आणि त्याने अंकिताला हाताला धरून ओढत आत नेले. त्या दरम्यान ते चार तरुण पुन्हा कारमध्ये बसून रिसाॅर्टमधून बाहेर पडले. त्याच्या काही वेळानंतर पुलकित, साैरभ, भास्करही अंकिताला घेऊन कुठेतरी बाहेर घेऊन गेले. अभिनव म्हणाला, १५ सप्टेंबरला रिसाॅर्टमध्ये नाेकरीला लागलाे. आधी झालेल्या घटनाक्रमाबद्दल मला सांगता येणार नाही. पोलिस आता या प्रकरणात चार व्हिआयपींच्या मागावर आहेत.

मुख्य आरोपीचा कबुलीजबाब दिशाभूल करणारा : पथकाला चिला नहरजवळ एक माेबाइल फाेन सापडल्याचे पोलिसांनी मुख्य आरोपी पुलकितच्या कबुली जबाबावरून म्हटले होते. परंतु तपासात पुलकितचा दावा खोटा निघाला. दोघांत भांडण होऊन अंकिताने तो फोन तलावात फेकल्याचे म्हटले होते. वास्तविक त्याचे लोकेशन दुसरे असल्याचे स्पष्ट झाले.

अधिकाऱ्यास झाली अटक

हत्याकांडात तलाठी वैभव प्रतापला एसआयआयटीने अटक केली आहे. या आधी या प्रकरणात बेपर्वाई दाखवणाऱ्या त्यास निलंबित करण्यात आले हाेते. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी प्रकरणाच्या तपासासाठी पाेलिस महासंचालक पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एसएसआयटीची स्थापना केली आहे. अंकिताचे वडील सर्वात आधी महसूल पाेलिस व्यवस्थेकडे तक्रार दाखल करण्यासाठी महसूल निरीक्षक वैभव प्रताप सिंह यांच्याकडे गेले हाेते. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...