आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Respect For Theocracy Over Monarchy In India; Statement By Leader Of Opposition Devendra Fadnavis

वाराणसी:भारतामध्ये राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला मान; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वाराणसी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगलांच्या आक्रमण काळात हिंदूंची मंदिरे नष्ट करणे, संस्कृतीचा ऱ्हास करण्यासाठी अनेक हल्ले झाले. परंतु अनादिकालापासून टिकून असलेल्या संस्कृतीला कोणीही संपवू शकत नाही. संत-महंत आणि ऋषिमुनींनी विचारांची पेरणी केली, त्यातून एकोपा वाढला. आपण मोगलांसह ब्रिटिश आणि अनेक परकीयांची आक्रमणे परतवून लावली.

संत-महंतांमुळेच आपली संस्कृती टिकून आहे, कारण आपल्या भारत देशात राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेला मान दिला जातो, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाराणसीत काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांचा अमृतमहोत्सव आणि देशाचा ‘आजादी का अमृत उत्सव' या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाचे स्वागत सिद्धलिंग शिवाचार्य यांनी केले, तर संगय्या शास्त्री यांनी स्वागतगीत गायले. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रास्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...