आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे एअरलाइन्स कंपन्यांना पत्र:खासदारांना मान द्या; पसंतीच्या जागेसह विमानतळावर VIP पार्किंग, चेक इनमध्ये प्राधान्य आणि लॉउंज एक्सेस सुद्धा उपलब्ध करून द्या

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडिया टाटाकडे गेल्यानंतर आता केंद्र सरकारला एअरपोर्ट आणि खासदारांच्या VIP सीटाची चिंता लागली आहे. त्यासाठी सरकारने एअर इंडिया आणि अन्य एयरलाइन कंपन्यांना यासंबंधी पत्र पाठवलं आहे. ज्यात खासदारांच्या विमानप्रवासाबाबत तसेच सोयी, सुविधांबाबत उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी सरकारने सर्व एयरलाइन, एअरपोर्ट ऑपरेटर्स आणि विमानन सुरक्षा नियमकांना विमानतळावर संसद सदस्यांना (खासदार) प्रोटोकॉल प्रदान करण्यास सांगितले आहे.

एअर इंडिया टाटाकडे गेल्यानंतर एलायंस एयरलाइन्स अपवाद वगळता सर्व एयरलाइन्सचे खासगीकरण करण्यात आले आहे. सोबत देशात PPP अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप विमानतळाची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सीट बुकिंगमध्ये खासदारांना प्राधान्य
'केंद्रीय हवाई मंत्रालय द्वारा 21 सप्टेंबर 2021 रोजी जारी केलेल्या पत्रात म्हटले होते की, विमानतळावर खासदारांना प्रोटोकॉल देण्यासाठी वेळोवेळी निर्देश जारी करण्यात आले आहेत. अनेकदा विमानतळावर खासदारांना प्रोटोकॉल मिळत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा हे निर्देश जारी करण्यात येत असून, सर्वांना आवाहन आहे की, याचे पालन करणे गरजेचे आहे.' असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.

या पत्रात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, याचा पालन एअर इंडियाला करावेच लागणार आहे. सीट बुकिंग करतांना खासदारांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच एखाद्या वेळी जर सीट खाली नसेल, बुकिंग रद्द झाल्यानंतर ती सीट खासदारांना देण्यात यावे. असे सांगण्यात आले आहे.

या सुविधा देण्यात याव्या

  • विमानतळावर खासदार चेक-इन करतांना तेथील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना सुविधा आणि सहकार्याची विनंती करण्यात आली आहे.
  • खासदारांना विमानात त्यांच्या आवडीचे सीट देण्यात यावे.
  • खासदारांसाठी विमानात सर्वात समोरच्या टप्पात सीट उपलब्ध करून देण्यात यावे.
  • खासदाराच्या प्रवासाची पुर्वकल्पना तेथील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, जेणेकरून योग्य तो नियोजन होऊ शकेल.
  • एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने खासदारांना मोफत चहापाण्याची व्यवस्था करावी.
  • विमानतळावर खासदारांच्या गाड्यांसाठी VIP पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावे.
  • खासदारांची गैरसोय होणार नाही त्यासाठी विमानतळावर विशेष कर्मचारी नेमावे.
  • चेक-इन दरम्यानची गैरसोय टाळण्यासाठी CISF सोबत सहकार्य करावेच

बातम्या आणखी आहेत...