आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा पोटनिवडणूक:6 राज्यांतील 7 पैकी 4 जागा BJPला; बिहारमध्ये RJD, तेलंगानात TRS, महाराष्ट्रात ठाकरेंचा पक्ष विजयी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील 6 राज्यांतील 7 विधानसभा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आलेत. त्यात 4 जागांवर भाजपचा डंका वाजला आहे. उत्तर प्रदेशाच्या गोला गोकर्णनाथ, बिहारच्या गोपालगंज, ओडिशाच्या धामनगर व हरियाणाच्या आदमपूर मतदार संघात भाजपचा विजय झाला आहे. बिहारच्या मोकामात राजद उमेदवार तथा बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांचा विजय झाला आहे. तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती व महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय झाला आहे. या सर्वच ठिकाणी गत 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली होती.

बिहारच्या मोकामा मतदार संघात राजद उमदेवार नीलम देवी यांचा विजय झाला.
बिहारच्या मोकामा मतदार संघात राजद उमदेवार नीलम देवी यांचा विजय झाला.

बातमी पुढे वाचण्यापूर्वी राज्यवार मतदार संघ व उमेदवारांची माहिती घ्या...

राज्यसीटजीत
बिहारमोकामानीलम देवी (RJD)
बिहारगोपाळगंजकुसुम देवी (BJP)
हरियाणाआदमपुरभव्य बिश्नोई (BJP)
उत्तर प्रदेशगोला गोकर्णनाथअमन गिरी (BJP)
तेलंगानामुनुगोड़ेकुसुकुंतला प्रभाकर रेड्डी (TRS)
महाराष्ट्रअंधेरी ईस्ट (मुंबई)ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव गट)
ओडिशाधामनगरभाजप

सर्वाधिक 75.25% मतदान हरियाणाच्या आदमपूर मतदार संघात झाले होते. तर सर्वात कमी 31.74% मतदान अंधेरी पूर्व मतदार संघात झाले होते. ज्या मतदार संघांत पोटनिवडणूक झाली, त्यातील प्रत्येकी 2 जागा काँग्रेस व भाजपच्या ताब्यात होत्या. तर बीजेडी, शिवसेना व राजदच्या खात्यात प्रत्येकी एक जागा होती.

UPच्या गोला गोकर्णनाथमध्ये भाजपचा विजय

लखीमपूर खीरीच्या गोला गोकर्णनाथ मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमन गिरी यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी सप उमेदवार विनय तिवारी यांचा 34,298 मतांनी पराभव केला. मार्जिनमध्ये त्यांनी आपले वडील अरविंद गिरी यांचा विक्रमही मोडला आहे. 2022 मध्ये अरविंद गिरी यांनी सपच्या विनय तिवारी यांचा 29294 मतांनी पराभव केला होता.

उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी ट्विट केले होते की, या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमन गिरी यांना मोठ्या अंतराने विजय मिळवून देणार आहे. पुन्हा एकदा कमळ उमलेल व सायकल पंक्चर होईल. सपच्या गुंडगिरीचा अंत होईल. भाजपच्या सुशासन, विकास व राम राज्याला जनतेचा आशीर्वाद आहे.

बातम्या आणखी आहेत...