आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाण्या-पिण्याच्या वस्तू आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे यंदा एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर वाढून ७.७९ टक्क्यांवर गेला. गेल्या आठ वर्षांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी मे २०१४ मध्ये तो ८.३३% नोंदवला गेला होता. या वर्षी मार्चमध्ये तो ६.९५% होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या किरकोळ महागाईच्या मासिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर हे सरासरी ८.३८% वाढले.
सलग चौथ्या महिन्यात किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक पातळीच्या वर आहेत. सरकारने आरबीआयला २% चढ-उताराच्या फरकाने चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या आसपास ठेवण्याचे लक्ष्य दिले आहे, परंतु खाद्यान्न व इंधनाच्या अनियंत्रित किमतींनी रिझर्व्ह बँकेचे संपूर्ण गणित बिघडवले आहे.
इंधन महागाई कमी करण्यास कर, शुल्क कमी करण्याची गरज
^एप्रिलमधील किरकोळ महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. हा दर ७.२ टक्क्यांच्या आसपास नोंदवला जाण्याचा अंदाज होता. एप्रिलमध्ये इंधन आणि वीज महागाई १०.८ टक्के वाढली.ते कमी करण्याची आवश्यक्ता आहे. सरकारला कर, शुल्क कमी करावे लागेल. व्यक्तिगत तसेच घरगुती वस्तू यासारख्या उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत कारण उत्पादकांनी त्याचा बोजा ग्राहकांवर टाकला आहे. या किमती कमी होणे अपेक्षित नाही कारण एकदा एमआरपी वाढली की ती कमी होण्याची शक्यता कमी असते.
-मदन सबनवीस, मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.