आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Retired Army Has Added 15 Lac Of Gratuity Pension. Donated To The Prime Minister's Relief Fund

देवदूत:देशाचेच असलेले पैसे मी देणगीच्या स्वरूपात परत करताेय; निवृत्त सैनिकाने दिले पेन्शनचे 15 लाख

मीरत3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • काेेराेनाग्रस्तांसाठी जवान करत आहेत आर्थिक मदत; चिमुकल्यांचेही काेवळे हात सरसावले
  • १९७१ च्या पाक युद्धात मोहिंदर सिंग यांनी गमावला एक डाेळा

एम रियाज हाशमी 

कोरोनाच्या आव्हानात्मक संकटाचा सामना करण्यासाठी आता सैन्य दलाचा एक निवृत्त जवान मैदानावर उतरला आहे. त्याने आपल्या आर्थिक स्वरूपातील मदतीतून या संकटाला राेखण्यासाठी सहभाग नाेंदवला. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या जवान माेहिंदर सिंग यांनी आपल्या निवृत्तीनंतर मिळालेले पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचे १५ लाख रुपये हे बाधितांसाठी देणगीच्या स्वरूपात दान केले आहेत. त्यांच्या या कार्याचे खास काैतुक हाेत आहे. 

भारतमातेने मला हे पैसे दिले हाेते. आता देश संकटात असताना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. याचा फायदा गरजूंना हाेईल, अशी प्रतिक्रिया ८५ वर्षीय माजी सैनिक माेहिंदर यांनी दिली.

बाधितांसाठी भाऊ-बहिणीकडून खाऊचे पैसे 

रायपूर येथील भाऊ-बहिणीने काेराेनाग्रस्तांसाठी केलेली आर्थिक मदत अधिक लक्षवेधी ठरत आहे. या दाेघांनी खाऊसाठी जमा केलेले १७७० रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केले. यात नऊवर्षीय भाऊ एेश्वर्य आणि सातवर्षीय बहीण वीराचा समावेश आहे. या दाेघांनी ही बँक तात्यापूर पाेलिस अधिकाऱ्यांकडे साेपवली आहे. 

१७ दिवसांत ४६४३ युनिट रक्ताचे संकलन

मदतीसाठीचे एक माेठे उदाहरण रांची शहरात दिसून अाले. या ठिकाणी असलेल्या तरुण अाणि नागरिकांनी पुढाकार घेताना १७ दिवसात ४६४३ युनिट रक्त संकलित झाले अाहे. २२ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान राबवलेल्या माेहिमेमुळे हे शक्य झाल्याचे रंजन यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...