आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Retired Officers Intelligence Or Security Related Organisation, No Publication Without Govt Permission

निवृत्तीनंतरही गुप्तता:आता निवृत्तीनंतरही आपल्या विभागाची माहिती गुप्त ठेवतील अधिकारी; केंद्र सरकारचा गोपनियतेबद्दल मोठा निर्णय

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की, गुप्तचर संस्था किंवा सुरक्षा संबंधित विभागांचे सेवानिवृत्त अधिकारी त्यांच्या खात्याशी किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याशी संबंधित गोष्टी सार्वजनिक करू शकत नाहीत. यापूर्वी त्यांना त्यांच्या विभागाच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल. कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने 31 मे रोजी हे आदेश दिले आहेत.

सेवानिवृत्त झाल्यानंतर गुप्तचर विभाग किंवा सुरक्षेशी संबंधित एखादा अधिकारी, आपला विभाग किंवा विभाग प्रमुख यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्या विभाग, विभागाचे कोणतेही अधिकारी, त्यांच्या पदाविषयी कोणतीही गोष्ट सार्वजनिक करू शकत नाही. या माहितीमध्ये विभागात काम करताना प्राप्त झालेल्या अनुभवाचा देखील समावेश आहे.

कोणतीही संवेदनशील माहिती जी देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वास धोका दर्शवते. याशिवाय देशाच्या सुरक्षा, मुत्सद्दी, वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधित मुद्द्यांशी संबंधित कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. इतर देशांशी संबंधित कोणतीही माहितीही या अंतर्गत येते.

जी माहिती सार्वजनिक करण्यासाठी परवानगी मागितली आहे, ती संवेदनशील आहे की नाही याविषयी विभाग प्रमुखच हे ठरवतील. तसेच ही माहिती विभागाच्या अखत्यारीत येते की नाही हेसुद्धा विभाग प्रमुख ठरवतील.

बातम्या आणखी आहेत...