आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे एका माजी सैनिकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी पैसे मागितले आहेत. लष्कराचा हा रिटायर्ड मेजर आपल्या पत्रामध्ये म्हणतो - आमच्या वस्तीपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्यामुळे मला हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी सरकारी अनुदान द्या. येथील खड्डे व चिखलामुळे पायी चालणे अवघड आहे. हेलिकॉप्टर मिळाले आम्ही उडत खड्ड्यांच्या पलिकडे जावू.
त्रासाला कंटाळून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
रिटायर्ड आर्मी मेजर दत्तू भापकर हे शेवगाव तालुक्यातील सालवडगावचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, येथील रस्ते एवढे खराब आहेत की त्यांच्यावरून चालणेही मोठे दिव्य आहे. रस्ता तयार करण्यासाठी आम्ही प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे वैतागून मी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकापत्राद्वारे हेलिकॉप्टरची मागणी केली.
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसह या पत्राची प्रत शेवगावचे तहसीलदार, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे व शेवगाव पार्थडीच्या आमदार मोनिका राजळे यांनाही पाठवली आहे.
या बातम्याही वाचू शकता...
मुलीला लग्नात दिली जेसीबीची भेट VIDEO:वडील म्हणाले- कार दिली तर घरासमोर उभी राहीली असती, पण यामुळे कमाई होईल
लग्नात मुलीला दुचाकी किंवा कार देण्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण उत्तरप्रदेशातील हमीरपूरमध्ये एका वधूपित्याने आपल्या मुलीला लग्नात चक्क जेसीबी भेट दिला आहे. नवरीचे वडिल सेवानिवृत्त आर्मीमॅन आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
'स्विफ्ट'चे 'लॅम्बोर्गिनी'मध्ये रुपांतर करून दिली आसामच्या CMला भेट:कछारमध्ये हीच कार पाहून बिसवा म्हणाले होते -प्रवास रोमांचक झाला
करीमगंजचे मोटार मेकॅनिक नुरुल हक शुक्रवारी जुन्या मारुती स्विफ्टचे लॅम्बोर्गिनीत रुपांतर करून गुवाहाटीला पोहोचले. तिथे त्यांनी ही गाडी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांना एक मॉडिफाइड लॅम्बोर्गिनी कार भेट म्हणून मिळाली आहे. ही कार मारुती स्विफ्टला मॉडिफाइड करून तयार करण्यात आली आहे. इनोव्हेटर नुरुल हक यांनी ही कार गिफ्ट केली. त्यानंतर सरमा यांनी एका ट्विटद्वारे नुरुल यांचे आभार मानले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.