आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:गुंतवणुकीसाठी 82% भारतीय गुंतवणूकदारांचे सेवानिवृत्तीला प्राधान्य नाही, जगातील निम्म्या गुंतवणूकदारांंच्या दृष्टीने हे गरजेचे

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीएफएने ११५ जागतिक अार्थिक बाजारपेठांचे सर्वेक्षण करून अहवाल केला प्रसिद्ध

भारतीय गुंतवणुकीच्या दृष्टीने देशातील गुंतवणूकदार निवृत्तीला फारसे प्राधान्य देत नाही. भारतात केवळ १५ टक्के गुंतवणूकदार निवृत्ती हे लक्ष्य ठेवून गुंतवणुकीला प्राधान्य देतात. जागतिक पातळीवरील ५० टक्के गुंतवणूकदार हे सर्वात महत्त्वाचे मानत असल्याचा दावा सीएफए इन्स्टिट्यूट या गुंतवणूक व्यवस्थापन व्यावसायिकांच्या जागतिक संघटनेने अापल्या अहवालाच्या चाैथ्या अावृत्तीमध्ये केला अाहे. ८७ टक्के भारतीय गुंतवणूकदार भारतीय अार्थिक बाजारपेठेवर विश्वास करतात. २०१८ मध्ये देशात हा अाकडा ७१ टक्के हाेता म्हणजे या क्षेत्रावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत चालला अाहे, तर ४७ टक्के जागतिक गुंतवणूकदार व अाशिया प्रशांतमधील ४९ % गुंतवणूकदारांचा वित्तीय सेवा उद्याेगावर विश्वास असल्याचे या अहवालात म्हटले अाहे. या संस्थेने १५ जागतिक बाजारातल्या रिटेल अाणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचे संशाेधन अाणि सर्वेक्षण केले अाहे.

भारतीय समभाग बाजारपेठेने दीर्घकाळात चांगला परतावा दिला अाहे साेबतच यंत्रणेवरील विश्वास अाणि अपेत्क्षा वृद्धिंगत करण्यास मदत झाली अाहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा अात्मविश्वासही वाढला अाहे. सध्याची वेळ अाव्हानात्मक असून अार्थिक जगतात विश्वासची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सीएफएने अहवालात म्हटले अाहे. गुंतवणूकदारांचा फायदा सुनिश्चित करणे व विश्वास कायम ठेवणे ही अंतिमत: अापल्या उद्याेगाची जबाबदारी अाहे. भांडवल बाजार नियंंत्रक सेबीसह या क्षेत्रातील इकाेसिस्टिमशी निगडित संस्थांनी अार्थिक साक्षरता, पारदर्शकता व बाजाराला याेग्य दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अाहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याचा पाया रचला गेला. त्यामुळेच प्रत्येकासाठी लाभदायक ठरत अाहे. पण तरीही या क्षेत्रात अाणखी खूप करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले अाहे. देशातील ८७ टक्के रिटेल गुंतवणूकदारांकडून वित्तीय सेवा उद्याेगावरचा विश्वास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या १५ बाजारपेठेत सर्वेक्षण केले त्यात भारत अाघाडीवर अाहे. अाॅस्ट्रेलिया अंतिम स्थानावर अाहे. येथील २४ टक्क्यांनी या उद्याेगावर विश्वास असल्याचे सांगितले. २०१८ च्या तुलनेत २०२० मध्ये हाँगकाँग, संयुक्त अरब अमिरात, ब्राझील या देशांचा विश्वास सर्वात जास्त वाढला.

निफ्टीने तीन महिन्यांत अमेरिका, जपानपेक्षाही दिला जास्त परतावा

निफ्टीने गेल्या तीन महिन्यांत ३५.२ टक्के फायदा गुंतवणूकदारांना दिला. या कालावधीत अमेरिकेच्या शेअर बाजारांनी २८ % तर जपानच्या बाजाराने २५ टक्के परतावा दिला े. जर्मनीच्या बाजाराने २९ टक्के व फ्रान्सच्या बाजाराने १८ % परतावा दिला. तेजीने सुधारणा करत एमएससीअाय इंडिया इंडेक्सने एमएससीआय इमर्जिंग मार्केट (ईएम) इंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली. तीन महिन्यात एकूण बाजार भांडवल ५३,०००० काेटी डाॅलरने वाढून १.८ लाख काेटी डाॅलरवर गेले.

बातम्या आणखी आहेत...