आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Review Of Six States After Relief In Lockdown 4, Shops Outside Containment Zone, Bus taxi Start

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थचक्र पूर्वपदावर:लॉकडाऊन 4 मध्ये सूट मिळाल्यानंतर सहा राज्यांचा आढावा, कंटेनमेंट झोनबाहेर दुकाने, बस-टॅक्सी सुरू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : सम-विषम फॉर्म्युल्यानुसार बाजारपेठा सुरू, गफ्फार मार्केटमध्ये मोबाइल दुरुस्ती - Divya Marathi
नवी दिल्ली : सम-विषम फॉर्म्युल्यानुसार बाजारपेठा सुरू, गफ्फार मार्केटमध्ये मोबाइल दुरुस्ती
  • दिल्लीत लगबग, जयपूरमध्ये सराफी व्यवसाय सुरू

लॉकडाऊन ४ मध्ये सूट मिळाल्यानंतर सोमवारी अनेक राज्यांत नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू झाली. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये रस्त्यांवर जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसले. तामिळनाडूमध्ये अद्यापही सक्ती असून काही सूट मिळाली. मंगळवारी दिल्लीत अनेक प्रमुख बाजारपेठा सुरू झाल्या, तर जयपूरमध्ये सराफी व्यवसाय सुरू झाला आहे.

नवी दिल्ली : सम-विषम फॉर्म्युल्यानुसार बाजारपेठा सुरू, गफ्फार मार्केटमध्ये मोबाइल दुरुस्ती

लॉकडाऊनमध्ये सूट मिळताच मंगळवारी दिल्लीत सार्वजनिक बससेवा, ऑटो-रिक्षा व टॅक्सीसेवा सुरू झाल्या. बसस्थानकांवर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. सम-विषम फॉर्म्युल्यानुसार अनेक मार्केट सुरू झाले. टिळकनगर, करोलबाग व सरोजनीनगरच्या दुकानांत व्यापाऱ्यांनी साफसफाईचे काम हाती घेतले आहे, तर कॅनॉट प्लेसवर व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर वर्तुळे काढण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांमध्ये सम-विषम फार्म्युल्याचा गोंधळ दिसून येतो आहे. दुकानावर गर्दी टाळा, असे अावाहन पोलिस करताना दिसतात. मध्य दिल्लीतील प्रसिद्ध गफ्फार मोबाइल मार्केटही सुरू झाले. येथे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. लक्ष्मीनगर मार्केटमध्ये इतर दुकानेही सुरू झाली. दिल्लीत आजवर १००५४ संसर्ग झालेल्या व्यक्ती आढळल्या, तर १६० नागरिक मृत्युमुखी पडले अाहेत.

चेन्नई : चेन्नईसह १२ जिल्ह्यांत निर्बंध, २५ जिल्ह्यांत लॉकडाऊनमध्ये सूट, वसाहतीत थर्मल स्क्रीनिंग सुरू

लॉकडाऊन ४ काळात तामिळनाडूमध्ये २५ जिल्ह्यात सूट देण्यात आली. तर चेन्नईसह १२ जिल्ह्यात काही सूट मिळालेली नाही. २५ जिल्ह्यात बस, टॅक्सी-कॅब व खासगी वाहनांना सूट देण्यात आली. चेन्नईत सरकारी कार्यालये सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर निर्बँंध आहेत. चेन्नईवगळता राज्यातील सर्व औद्योगिक कारखाने सुरू झाले. राज्यांत ११,७६० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर ८१ लोक दगावले आहेत.

बंगळुरू : नागरिक सकाळीच पार्कवर, रस्त्यांवर गर्दी, बससेवा सुरू; फक्त पासधारकांना मिळाली परवानगी

लॉकडाऊन -४ मध्ये सूट देण्याची घोषणा झाल्यानंतर मंगळवारपासून राज्यांत बीएमटीसी व कर्नाटक बस परिवहनच्या सेवा सुरू झाल्या आहेत. कॅम्पागौडा स्थानकावर मंगळवारी सकाळी गर्दी झाली. काही तासापुरते सुरू झालेल्या लालबाग व क्यूबन पार्कमध्ये शेकडोच्या संख्येने लोक आले. रस्त्यांवरही वाहनांची गर्दी दिसून आली. राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या १३७३ इतकी झाली आहे.

अहमदाबाद : पहिल्या ग्राहकाचे पुष्पहाराने स्वागत, पानदुकानांवर रांगा

गुजरातमध्ये कंटेनमेंट झोनच्या बाहेर मंगळवारपासून सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत सम-विषम फार्म्युल्यानुसार दुकाने सुरू झाली. लोक खरेदीसाठी बाहेर पडले. सरकारी कार्यालये ३३% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु झाली. अहमदाबादमध्ये सीजी रस्त्यावर कमी वर्दळ होती. तर पानटपऱ्यांवर प्रचंड गर्दी दिसून आली. लोकांनी मोबाइलही दुरुस्त करवून घेतले. अनेक दुकानदारांनी पहिल्या ग्राहकांचे स्वागत पुष्पहाराने केले. राज्यात ११ हजार ७४६ कोरोनाबाधित असून ६९४ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

जयपूर : ब्यूटी पार्लर-सलून उघडले; चाकरमान्यांमुळे रस्ते वाहतूक जाम

गेल्या ५९ दिवसांपासून जयपूरचे सराफा व दागिन्यांचा व्यवसाय मंगळवारपासून सुरू झाला. रेड, आॅरेंज व ग्रीन झोनमध्ये ब्यूटी पार्लर, सलून, स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स, स्टेडियम व पोलो ग्राउंड उघडण्याची परवानगी आहे. बस-वाहतूक व कारखाने सुरू झाले आहेत. रेड झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जयपूरमध्ये नोकरदार मंडळी कार्यालयास जाण्यासाठी सकाळीच बाहेर पडली. यामुळे रस्ते वाहतूक जाम झाली होती. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७५७ असून १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : अॅपवरील कॅबसेवा सुरू, रेड झोनमध्ये ई-कॉमर्सद्वारे होम डिलिव्हरीची सुविधा

राज्यातील ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये दुकाने, सार्वजनिक परिवहन बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली अाहे. मुंबईकर मंगळवारी कामावर निघाले. तेव्हा पश्चिम महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अॅपवरील कॅबसेवा सुरू झाल्या आहेत. रेड झोनमध्येही ई-कॉमर्स फर्मद्वारे इतर वस्तुंची होम डिलिव्हरी सुरू झाली आहे. या झोनमध्ये सर्व औद्योगिक संस्था व बांधकामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मंगळवारी बांद्रा रेल्वे स्थानकावर मजु रांची गर्दी झाली होती. येथून बिहारसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे जाणार होती.यासाठी १००० मजुरांनी नोंदणी केली हाेती. परंतु ५ हजारांहून अधिक मजुर तेथे दाखल झाले. त्यामुळे गाेंधळास सुरूवात झाली. प्रारंभी पोलिसांनी त्यांना घरी परत जाण्याचे आवाहन केले. पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून लाठीमार केला. मुुंबईत संसर्ग वाढत चालल्याने मंगळवारपासून सीआयएसएफ व सीआरपीएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. औरंगाबादेत किराणा दुकाने २१ मे पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाने किराणा दुकानांना सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा एकुण आकडा ३९,२९७ इतका झाला असून बळींची संख्या १३९० वर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...