आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Riot In India | Marathi News | The Highest Number Of 721 Riot Cases Were Registered In Bihar In The Last Five Years Ethnic Riots In The C1ountry Decreased, Punishment Increased, In 2020 61% Riots In Delhi

मागील 5 वर्षांत 3399 जातीय दंगली:देशात जातीय दंगली घटल्या, शिक्षेचे प्रमाण वाढले, 2020 मध्ये 61% दंगली दिल्लीत

​​​​​​​पवनकुमार | नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दंगलींचा दंश बिहारमध्ये 5 वर्षांत दंगलीचे सर्वाधिक 721 गुन्हे दाखल
  • मागील 5 वर्षांत 3399 जातीय दंगली, यात 18,512 जणांना अटक

देशात जातीय दंगलीच्या गुन्ह्यांत घट होत आहे. आता पूर्वीच्या तुलनेत जास्त संख्येने दंगलखोरांना न्यायालयाने शिक्षा केली आहे. दंगलीत सहभागी लोकांना तीन ते चार वर्षापूर्वी दीड ते तीन टक्के लोकांना शिक्षा होत होती. आता ही संख्या वाढून १० टक्क्यांवर गेली आहे. देशात मागील ५ वर्षांत ३,३९९ दंगली झाल्या होत्या. दंगलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. सन २०२० मध्ये देशात दंगलीची एकूण प्रकरणे ८५७ होती. यात दिल्लीतच ५२० (सुमारे ६१ टक्के) गुन्हे दाखल झाले आहेत. जर दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात या वर्षात दंगली झाल्या नसत्या तर पाच वर्षात देशातील सर्वात कमी दंगलीचा विक्रम नोंदला गेला असता.

सन २०२० मध्ये उत्तर प्रदेशशिवाय उत्तराखंड, छत्तीसगड, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरासह काही केंद्रशासित प्रदेशात दंगलीची एकही घटना नोंद नाही. मागील पाच वर्षात केंद्रशासित प्रदेशात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरशिवाय कोणत्याही केंद्रशासित प्रदेशात दंगल उसळली नाही. मागील पाच वर्षात दंगलीचे सर्वाधिक ७२१ गुन्हे बिहार, ५२१ दिल्ली ४२१ हरियाणा आणि २९५ प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवले गेले. यात अटकेतील आरोपींची संख्याही वाढली आहे.

२०१९ मध्ये सर्वाधिक ३३२ जणांना शिक्षा
शिक्षेचे प्रमाणही वाढले.. सन २०१६ मध्ये दंगल प्रकरणात अटकेतील लोकांपैकी १.४२%, २०१७ मध्ये २.४४%, २०१८ मध्ये ४.०८%, २०१९ मध्ये १३.८०% आणि २०२० मध्ये अटकेतील लोकांपैकी ११.१० दोषींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

वर्ष गुन्हे दाखल अटक आरोपपत्र सजा
2016 869 4618 4933 66
2017 723 5329 3853 157
2018 512 4097 4169 200
2019 438 2405 2281 332
2020 857 2063 1908 229

बातम्या आणखी आहेत...