आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलाे इंडिया यूथ गेम्स:ऋषिप्रसादला दुसरे राैप्यपदक;बाॅक्सिंगमध्ये गाेल्डन हॅट‌्ट्रिक

भाेपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद क्रीडा प्रबाेधनीच्या ऋषिप्रसाद देसाईने खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये शनिवारी दुसरे राैप्यपदक पटकावले. त्याने रिलेमध्ये पुरुष संघासाेबत हे यश संपादन केले. तसेच यूथ वर्ल्ड चॅम्पियन देविकासह कुणाल आणि उमर शेखने बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये आपले वर्चस्व गाजवत महाराष्ट्र संघाकडून गाेल्डन हॅट््ट्रिक साजरी केली. या तिघांनीही आपापल्या वजन गटात चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. युवा जिम्नॅस्ट सारा राऊळ सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तसेच आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानाेळे आणि संज्ञा पाटीलने पदकाची हॅट््ट्रिक केली. महाराष्ट्राच्या महिला रिले संघाने भाेपाळच्या अॅथलेटिक ट्रॅकवर साेनेरी यशाचा पल्ला गाठला.

जिम्नॅस्टिक प्रकारात सारा राऊळने महाराष्ट्राचे सुवर्ण खाते उघडले. मुलींच्या सर्वसाधारण क्रीडा प्रकारात तिने सुवर्णपदकाची कमाई केली. तिने ३९.३३४ गुणांसह हे यश मिळवले. महाराष्ट्राच्या रियाला ३६.२६६ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांच्या वैयक्तिक प्रकारात आर्यन दवंडेने फ्लोअर एक्झरसाइज प्रकारात रौप्य मिळवले. महाराष्ट्राचाच मानन कोठारी कांस्यपदकाचा मानकरी ठरला. आर्यनला आजही रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. आर्यनने १२.०३३ गुणांची कमाई केली. आर्यन दवंडे याने जिम्नॅस्टिक्समधील व्हॉल्ट प्रकारात सोनेरी यश संपादन केले. त्याने १३.१२ गुणांची कमाई केली. मुंबईच्या सार्थक राऊळ याने व्हॉल्ट प्रकारात १२.६८ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. आकर्षक केरिन प्रकारात संज्ञा रौप्य आणि पूजा कांस्यपदकाची मानकरी ठरली. ट्रॅक प्रकारात महाराष्ट्राने आतापर्यंत तीन सुवर्ण, ४ रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली आहेत.

महाराष्ट्राने बाॅक्सिंगमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या उमर अन्वर शेख, देविका घोरपडे, कुणाल घोरपडे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. उस्मान अन्सारीला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे मुलांच्या विभागात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर राहिला. युवा वर्ल्ड चॅम्पियन देविकाने ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. तिने फायनलमध्ये यजमान मध्य प्रदेशाच्या काफी कुमारीचा पराभव केला. उमरने ४८ किलो वजन गटात पंजाबच्या गोपीकुमारचा पराभव केला. कुणालने ७१ किलो वजन गटात हरियाणाच्या साहिल चौहानला हरवले. त्यामुळे त्याला किताबाचा बहुमान मिळाला.

ॲथलेटिक्स : महिला रिले संघ चॅम्पियन; पुरुष संघाला राैप्य ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात मुलींनी ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. रिया पाटील, ईशिका इंगळे, गौरवी नाईक, ईशा रामटेके या चोघींनी ४९.०७ सेकंद वेळ देताना सुवर्णपदकावर नाव कोरले. मुलांच्या चमूला मात्र ४२.४१ सेकंदांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महेश जाधव, संदीप गोंड, ऋषिप्रसाद देसाई, सार्थक शेलार यांचा या चमूत समावेश होता. मुलींच्या ३ हजार मीटर शर्यतीत कोल्हापूरच्या सृष्टी रेडेकरने १० मिनिट ८.०८ सेकंदांसह रौप्यपदक मिळवले. ११० मी. अडथळा शर्यतीत सार्थक शेलार (१३.८२ सेकंद) रौप्य, तर क्रीडा प्रबोधिनीच्या संदीप गोंडला (१३.९५ सेकंद) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

बातम्या आणखी आहेत...