आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात गव्हाच्या उत्पादनावर हवामान बदलाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी पूर्ण तयारी केली आहे. ते जास्त तापमानातही अधिक उत्पादन देणाऱ्या अशा वाणावर काम करत आहेत. कर्नाल येथील भारतीय गहू आणि जवस संशोधन केंद्रात पुढील अडीच दशके डोळ्यासमोर ठेवून संशोधन संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञांच्या अंंदाजानुसार या वेळी गव्हाचे उत्पन्न ११.२ कोटी टन होऊ शकते. २०२०-२१ मधील १०.९ कोटी टनाच्या तुलनेत मागील वर्षी ते १०.६ कोटी टन झाले होते. या वर्षी हे क्षेत्र गतवर्षीच्या ३४१.८४ लाख हेक्टरवरून ३४३.२३ लाख हेक्टर इतके वाढले आहे. गव्हाच्या ज्या २४ वाणांवर संशोधन सुरू आहे ते २०२२ मध्येच सुरू झाले आहे.
यात २० जाती शेतात पिकवल्या जात आहेत. शास्त्रज्ञ गव्हाच्या हंगामात फेब्रुवारीतील २५ ते ३० डिग्री तापमान ५ डिग्रीने वाढवून संशोधन करत आहेत, जेणेकरून या वाणांची उष्णता सहन करण्याची ताकद कशी वाढवता येईल. तीन वर्षांनंतर याचे ठोस निकाल समोर येतील. शास्त्रज्ञ या वेळी जास्त उष्णता असतानाही ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत आहेत. कृषी मंत्रालयाने समिती स्थापून पंजाब, हरियाणा, म.प्र., राजस्थान, उ.प्र.वर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांना आर्द्रतेबाबत जागरूक केले जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते रोपटे खूप समजदार आहे, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. परंतु आर्द्रता असेल तर रोपट्यावर परिणाम होत नाही. थोड्या सिंचनातूनही तापमानापासून रोपाचे संरक्षण करता येते. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी शेतीत पिकांचे अवशेष ठेवून पेरणी केली होती, तेथे पिकांचे उत्पन्न कमी झाले नव्हते. यामुळे तीन ते चार डिग्री जास्त तापमानही गव्हाचे काहीच बिघडवू शकत नाही.
मागील वर्षी चार ते पाच टक्के घटली होती आर्द्रता : देशात गेल्या वर्षी गव्हाचे पीक शेतातच पकले होते. तेव्हा शेतात गव्हातील आर्द्रता ८ ते ९ टक्केच उरली होती. सामान्यत: शेतात गव्हाच्या पिकात १२ ते १३ टक्के आर्द्रता असते. साधारणपणे गव्हातील आर्द्रता घटण्यासाठी तीन ते चार महिने वेळ लागतो. वातावरण बदलल्याने ते शेतातच घटले होते. देशभरात ३.५० टक्के गहू उत्पादन घटले होते.
भारत अन्नात सुरक्षित आहे, देशातील हवामान फायदेशीर : गहू संचालनालयाचे संचालक डॉ. ज्ञानेंद्र सिंह म्हणतात की, भारत हा जगातील असा देश आहे, जिथे गहू पिकावर हवामानाचा सर्वात कमी परिणाम होतो. कारण आपल्याकडे डायव्हर्स विंडो झोन अधिक आहे. येथे काश्मीर, मरूस्थळासह देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या हवामानात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी सुमारे १०० प्रकारचे गव्हाचे वाण शेतात असतात. आतापर्यंत ६०० हून अधिक जाती देशाला देण्यात आल्या आहेत.
पाइप लाइनमध्ये १५०० वर वाफे : गहू संचालनालय करनालमध्ये सध्या १५०० हून अधिक असे वाफे आहेत, ज्यातून विविध वाण निर्माण केले जातील. ते जर्म प्लाझम आहेत. यात दरवर्षी ४५० ते ५०० वाफे असतात. यावर सातत्याने संशोधन सुरू असते आणि नंतर विविध वाण जाहीर केले जातात. आता केवळ अधिक प्रोटीनच नव्हे तर जास्त उत्पादन आणि दुष्काळासह तापमान सहन करणाऱ्या वाणांवरच भर दिला जाणार आहे.
सर्कस बघून सुचली संशोधनाची कल्पना गहू शास्त्रज्ञ डॉ. रतन तिवारी म्हणाले, एकदा सर्कस बघण्यास गेलो. तेथील गोलाकार रचना बघून अशीच रचना करायचे ठरवले. ज्यात गहू उगवून त्यावर जास्त तापमानावर संशोधन करता येईल. यावर गहू संचालनालयानेही आराखडा बनवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.