आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हायरसविषयी नवी माहिती:5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा धोका, यांच्यातून कम्यूनिटी ट्रान्समिशनची शक्यता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरला आहे, परंतु संशोधकांना संसर्गाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे
  • अमेरिकन संशोधकांचा असा दावा आहे की, शिकागोमध्ये अशा 46 मुलांवर केलेल्या संशोधनानुसार 5 वर्षांखालील मुले ही संसर्गाचे मुख्य कारण बनू शकतात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शाळा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरत आहेत. परंतु संशोधकांनी संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगितले आहे. अमेरिकन संशोधकांनी असे म्हटले आहे की 5 वर्षांखालील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस आढळू शकतो. लहान मुलं हे संसर्गाचे महत्त्वपूर्ण कारण बनू शकतात. शिकागोमध्ये झालेल्या संशोधनात हा दावा केला गेला आहे.

5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 46 मुलांमध्ये करण्यात आले संशोधन

संशोधकांनुसार, 23 मार्चपासून 27 एप्रिलपर्यंत 145 रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. यामध्ये कोरोनाचे सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांचा समावेश होता. या रुग्णांना वयानुसार गटात विभागले गेले होते. पहिला गट 5 वर्षांपर्यंतच्या 46 मुलांचा बनलेला होता. दुसरा गट 5 ते 17 वर्षे वयोगटातील 51 मुलांचा बनलेला होता. तिसर्‍या गटात 18 ते 65 वर्षे वयोगटातील 48 लोकांचा समावेश होता.

कमी वयातील मुलं बनू शकतात कोरोनाचे वाहक

संशोधक टेलर हेल्ड सर्जंटच्या मते, या मुलांच्या श्वसन मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस आढळले. याचे प्रमाण जितके जास्त असेल तितक्या जास्त प्रमाणात संक्रमणाचा धोका वाढेल. संशोधकांचे म्हणणे आहे की 5 वर्षाखालील मुले कोरोना वाहक बनू शकतात आणि लोकसंख्येमध्ये संसर्ग पसरवू शकतात.