आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Riyaz Naikoo Death | Riyaz Naikoo Encounter | Jammu Kashmir Indian Army Encounter In Pulwama Updates; Hizbul Mujahideen Commander Riyaz Naiku Killed

चकमक:मोस्ट वाँटेड दहशतवादी रियाज नायकू चकमकीत ठार, ए++ कॅटेगरीच्या या दहशतवाद्यावर 12 लाखांचे बक्षिस होते

श्रीनगर3 वर्षांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • गणिताचा शिक्षक ते दहशतवादी बनलेला नायकू आजारी आईला भेटण्यासाठी घरी आला होता

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा टॉप कमांडर रियाज नायकू सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत बुधवारी मारला गेला आहे. पुलवामामध्ये नायकूचे गाव बेगपोरामध्ये झालेल्या या चकमकीत नायकूला कंठस्नान घालण्यात यश आले. सुरक्षादलाला बेघपोरा गावात नायकू आणि त्याची काही साथीदार लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलाने मंगळवारी त्याच्या घराबाहेर घेरा घातला. सुरुवातील फायरिंग झाली नाही आणि संपूर्ण दिवस हा घेरा कायम होता. परंतू, बुधवारी जवानांनी 40 किलो आयईडीने त्याचे घर उडवले आणि यात नायकूसह त्याचा साथीदार आदिल मारला गेला.

बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. नायकू सुरुवातील घरातील वरच्या मजल्यावर लपून बसला, नंतर जवानांवर फायरिंग करत खाली आला. त्याचा मृत्यू हा सुरक्षा दलाचे खूप मोठे यश आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशनवर याचा मोठा परिणाम पडेल. रियाज नायकू काश्मीरमध्ये सर्वात जास्त सक्रिय असलेला दहशतवादी होता. तो हिजबुल मुजाहिद्दीनसाठी काम करायचा. त्याला मोस्ट वाँडेड दहशतवाद्यांच्या ए++ कॅटेगरीमध्ये ठेवले होते आणि त्याच्यावर 12 लाख रुपयांचे बक्षिस होते. त्याच्यावर अनेक पोलिसांचे किडनॅपींग आणि खुनाचा गुन्हे दाखल होते.

बुरहान वानीनंतर नायकू हिजबुल कमांडर बनला

35 वर्षीय नायकू गणिताचा शिक्षक होता. नंतर दहशतवाद्यांसोबत मिळून मोस्ट वाँटेड बनला. 2016 मध्ये बुरहान वानीच्या मृत्यूनंतर नायकू हिजबुलचा कमांडर बनवा होता. बुरहानकडून नायकू दहशतवाद पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा खूप वापर करायचा. तो काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी होता आणि हिटलिस्टवर नंबर एकवर होता.

नायकू आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी आला होता

नायकू आपल्या गावी आजारी आईला भेटण्यासाठी आला होता. नायकू आपल्या ठराविक साथीदारांशिवाय इतर कोणावरच विश्वास ठेवत नसे. त्याने अनेक स्थानिक तरुणांना दहशतवादामध्ये ओढले होते. काश्मीरमध्ये 35 दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. 10 पेक्षा जास्त दहशतवादी यावर्षी हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाले.