आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hezbollah Leader Killed; He Was Rescued 3 Times By Throwing Stones; 40 Kg IED Blown Up Hiding PlaceRiyaz Naikoo Encounter | Jammu Kashmir Indian Army Encounter In Pulwama Updates; Hizbul Mujahideen Commander Riyaz Naiku Killed

मोठे यश:हिजबुल म्होरक्या नायकूचा खात्मा; ३ वेळा दगडफेकीने वाचवले होते; ४० किलो आयईडीने उडवले लपण्याचे ठिकाण

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुलवामात दोन चकमकी, चार अतिरेक्यांना कंठस्नान
  • खोऱ्यात दगडफेक सुरू, फाेन-इंटरनेट बंद

जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख रियाझ नायकूसह चार अतिरेकी बुधवारी ठार झाले. नायकूच्या (३२) आठ वर्षांपासून खोऱ्यात दहशतवादी कारवाया सुरू होत्या. पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा या नायकूच्या गावात सुरक्षा दलाने त्याला कंठस्नान घातले. नंतर तेथे दगडफेक सुरू झाली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच प्रशासनाने खोऱ्यातील फोन आणि इंटरनेट सेवा बंद केली.

२०१२ ला अतिरेकी, २०१६ मध्ये बनला पोस्टर बॉय

लष्कराच्या यादीत रियाझ नायकू A++ प्रकारचा दहशतवादी होता. अनेक काश्मिरी युवकांनाही त्याने दहशतवादी केले. नायकू पूर्वी एका खासगी शाळेत गणित शिकवायचा असे सांगितले जाते. २०१२ मध्ये दहशतवादी बनला. २०१६ मध्ये बुरहाननंतर नायकू नवा पोस्टर बॉय बनला होता. २०१७ मध्ये यासीन इट्टूच्या खात्म्यानंतर तो हिजबुलचा प्रमुख झाला.

बंदूक हाती घेतली तेव्हाच नायकूची नियती निश्चित झाली

नायकूने बंदूक हाती घेतली, तेव्हाच त्याची नियती निश्चित झाली होती. या मृत्यूचा वापर हिंसेसाठी व्हायला नको.-उमर अब्दुल्ला

नायकूचे नेटवर्क तगडे होते, सुरक्षा दलातही सूत्र होते

नायकूच्या खात्म्याने हिजबुलला नक्कीच तगडा झटका बसला आहे. अतिरेकी साधारण ४ वर्षांपेक्षा जास्त वाचत नाही. मात्र हा ८ वर्षे जिवंत होता. खोऱ्यात त्याचे नेटवर्क तगडे होते. लपण्याची अनेक ठिकाणे होती. सुरक्षा दलातही सूत्र होते. कोविड-१९ च्या काळात अतिरेक्यांना दीर्घकाळ एकाच जागी राहावे लागते आहे. पोलिस आणि एसओजीची गुप्त माहिती मिळवण्याची शक्ती अनेक पटीने वाढली आहे. मागील वर्षी मोबाइल नेटवर्क बंद झाल्यानंतर फिजिकल फोर्सने अतिरेक्यांवर पाळत ठेवणे सोपे झाले. अतिरेक्यांना रोखण्यासाठी पुन्हा बालाकोट करणार का, असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. मात्र एअरस्ट्राइकबाबत काहीच अंदाज वर्तवता येत नाही. 

- एक्स्पर्ट ले. जनरल (नि.) सय्यद अता हसनैन

बातम्या आणखी आहेत...