आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिहार निवडणूक निकाल हे NDA च्या बाजूने आले असले, तरीही राजद पराभव स्वीकारायला तयार नाही. निकाल आल्याच्या दोन दिवसानंतर राजद नेता तेजस्वी यादव म्हणाले की, जनतेचा आदेश महाआघाडीलाच मिळाला आहे. पण निवडणूक आयोगाचा निकाल NDA च्या बाजूने आला आहे.
तेजस्वी यादवांनी नितीश कुमारांवरही निशाणा साधला आहे, ते म्हणाले की, 'आम्ही रडणारे लोक नाही, संघर्ष करणारे लोक आहोत. जी पार्टी (जदयू) चेहरा बदलण्याविषयी बोलत होती, ती स्वतः तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. नितीश कुमारांमध्ये नैतिकता शिल्लक नाही, जर थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी खुर्ची सोडावी. ते जोड-तोड, भागाकार-गुणाकार करुन खुर्ची मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत'
NDA आणि महाविकास आघाडीचे अंतर पॉइंट वन परसेंट - तेजस्वी
तेजस्वी म्हणाले, 'NDA चोर दरवाज्याने सरकार बनवत आहे. भाजपने स्पष्टपणे समजून घ्यावे की, हा जनादेश बदलाचा जनादेश आहे. NDA चे वोट शेअर 37.3% आहे आणि महाआघाडीचा वोट शेअर 37.2% आहे म्हणजे वन पॉइंटच अंतर आहे. जर या अंतराला मतांमध्ये कनव्हर्ट केले तर 12 हजार 270 मते होतील.'
'नितीश यांनी बेरोजगारांना नोकरी देण्यात असमर्थता दाखवली आहे. बिहारच्या तरुणांना नोकरी मिळवण्याचा हक्क नाही का. देशात पहिल्यांदा एखाद्या पक्षाने आपल्या अजेंड्यामध्ये दहा लाख नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले होते. आम्ही लवकरच धन्यवाद यात्रा काढणार आहोत. जर शिक्षण आणि रोजगार क्षेत्रामध्ये सुधारणा झाली नाही तर महाआघाडीचे लोक आंदोलन करतील.'
दिव्यमराठीच्या प्रश्नावर म्हणाले - आम्ही सरकार बनवणार
दिव्यमराठीने तेजस्वी सरकार बनणार का यावर प्रश्न विचारला. राजद नेता म्हणाले, 'हो, आम्ही सरकार बनवणार. आम्ही आपल्या आमदारांनाही म्हटले आहे की, तुम्ही तयार राहा. काही अटींसह निवडणूक आयोगाने रद्द केलेल्या पोस्टल बॅलेटची ईमानदारीने तपासणी करावी.'
'40 दिवस पोस्टल बॅलेट सील करुन ठेवण्याचा नियम आहे. यामुळे हे लपवले जाऊ शकत नाही. 900-900 पोस्टल वोट रद्द करण्यात आले. याची रिकाउंटिंग व्हावी. आमच्या उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केला होता, हे देखील ऐकले नाही. आम्ही जे म्हणत आहोत. याचा पुरावा रिकॉर्डिंमध्ये असेल. आम्हालाही रेकॉर्डिंग पाहण्याचा अधिकार आहे. रात्रीच्या अंधारात खेळ करण्यात आला.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.