आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:राजदच्या रघुवंश प्रसाद सिंहांचा राजीनामा, विधान परिषदेतील ५ सदस्यांचीही पक्षाला सोडचिठ्ठी

पाटणा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार : राजदचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात
  • राज्य विधानसभेच्या निवडणुकीआधी जदयूने फोडला राजद

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलात (राजद) मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेडने (जदयू) फूट पाडली आहे. राजदच्या ५ विधान परिषद सदस्यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा देत जदयूत सामील झाले. तर, राजद उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. संजय प्रसाद, एस. एम. कमर, राधा चरण सेठ, रणविजय कुमार सिंह आणि दिलीप राय यांनी मंगळवारी विधान परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांची भेट घेत राजदचा राजीनामा सोपवला. आता विधान परिषदेत राजदचे तीन सदस्य राबडी देवी यांच्या शिवाय रामचंद्र पूर्व आणि सुबोध राय हेच राहिले. यामुळे माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद जाणे नक्की आहे. बिहारच्या ७५ सदस्यांच्या विधान परिषदेत जदयूचे २०, भाजपचे १७, राजदचे ३, काँग्रेसचे २, लोजप, हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि अपक्ष प्रत्येकी एक आहेत. तर, २९ जागा रिक्त आहेत. नियमानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागांच्या १०% म्हणजे कमीत कमी आठ जागा हव्यात.

रमा सिंह यांना प्रवेश दिल्याने नाराज होते सिंह
राजदच्या स्थापनेपासूनच पक्षात असलेले लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रघुवंश प्रसाद सिंह पक्षात रमा सिंह यांना सामील केल्याने नाराज आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रघुवंश सिंह यांचा रमा सिंह यांनी पराभव केला होता. तेव्हा रमा सिंह लोजपमध्ये होत्या. कोरोनाबाधित रघुवंश प्रसाद सिंह पाटण्यातील एम्समध्ये भरती आहेत. त्यांनी रुग्णालयातूनच आपला राजीनामा पाठवला आणि सांगितले की, ते पक्ष सोडणार नाहीत. मात्र, पक्षात ज्या प्रकारच्या लोकांना प्रवेश दिला जात आहे त्यामुळे ते खुश नाहीत. दरम्यान, जदयूचे राष्ट्रीय महासचिव आणि लोकसभेत पक्षाचे नेते राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांनी सांगितले की, रघुवंश यांना पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.

बातम्या आणखी आहेत...