आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात:एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू; वृद्ध दाम्पत्य, दोन मुले, त्यांच्या पत्नी आणि नातू जागीच ठार

मथुरा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा येथील यमुना एक्सप्रेस-वेवर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला असून २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये वृद्ध दाम्पत्य, त्यांची दोन मुले, त्यांच्या दोन पत्नी आणि 6 वर्षांचा नातू यांचा समावेश आहे. वृद्ध दाम्पत्याचा एक मुलगा आणि 3 वर्षांचा नातू गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये कुटुंबाचे 9 सदस्य होते. हे सर्व हरदोई येथील संदिला भागातील रहिवासी होते. सर्वजण लग्नात सहभागी होण्यासाठी नोएडाला जात होते.

कारचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. वाहकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने पुढे चालणाऱ्या वाहनाला धडक दिली. पोलिस आले तेव्हा घटनास्थळी दुसरे कोणतेही वाहन नव्हते. नौझील परिसरात हा अपघात झाला.

बराच वेळ गाडीत तडफडत होते जखमी
पोलिसांनी सांगितले की, सकाळी एका वाहन चालकाने डायल-112 ला अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढले. या धडकेत कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.अशा स्थितीत कटरने कार कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. या दरम्यान जखमी बराच वेळ गाडीतच अडकून पडले होते.

पोलिसांनी सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे 7 जणांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील कार वॅगनआर असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्रमांक-UP16 DB9872 आहे.

हरदोईहून नोएडाला जात होते
मथुरेतील अपघातात बळी पडलेले कुटुंब हरदोई येथील बहादूरपूर-सांडिला येथील रहिवासी होते. लग्नात सहभागी होण्यासाठी संपूर्ण कुटुंब नोएडाला जात होते. पोलिसांनी सांगितले की, राजेश, लल्लू, श्रीगोपाल, संजय, निशा, चुटकी, नंदनी, 6 वर्षीय धीरज आणि 3 वर्षीय क्रिश गाडीत होते. राजेश, श्री गोपाल आणि संजय हे सख्खे भाऊ आहेत.

या अपघातात लल्लू आणि त्याची पत्नी चुटकी, दोन मुले राजेश आणि संजय, दोन सून निशा आणि नंदनी आणि 6 वर्षांचा नातू धीरज यांचा मृत्यू झाला. लल्लू यांचा मुलगा श्रीगोपाल आणि ३ वर्षांचा नातू क्रिश हे गंभीर जखमी आहेत. मथुरेच्या या दुःखद अपघातावर मुख्यमंत्री योगींनी शोक व्यक्त केला आहे. जखमींवर चांगले उपचार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...