आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड:रस्ते चांगले, तिथेच जास्त अपघात, 5 वर्षांत 7000 अपघात, 5000 मृत्यू

डेहराडूनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये रविवारी चारधाम यात्रेच्या भक्तांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. यामुळे अपघातांसाठी बदनाम उत्तराखंड पुन्हा चर्चेत आले. आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत ७००० रस्ते अपघातात सुमारे ५००० लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकेच लोक गंभीर जखमी झाले. या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात ५०० रस्ते अपघातात ३०० लोकांचा जीव गेला. लोकसंख्येच्या हिशेबाने अपघात आणि त्यात होणारे मृत्यू देशात सर्वाधिक आहेत. या राज्यामध्ये आपत्तीपेक्षाही जास्त मृत्यू रस्ते अपघातांत झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे चांगल्या रस्त्यांवर कमी अपघात होतात, पण उत्तराखंडमध्ये स्थिती याच्या उलट आहे. या राज्यात जिथे रस्ते चांगले तिथेच जास्त अपघात होतात. ऑल वेदर रोड बनल्यानंतर रस्ते रुंद झाले आहेत. यामुळे चालक अतिवेगाने जात आहेत. मध्य प्रदेशच्या प्रवाशांची बसही यमुनोत्रीत अतिवेगामुळे दरीत कोसळली. जास्त फेऱ्या मारण्याच्या भातगडीत चालक केवळ ७-१० दिवसांत यात्रा पूर्ण करत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. आधी यासाठी १५ दिवस लागत होते.

चालकांचीच चुकी, तपासामध्ये उघड
यमुनोत्री हायवेवर डामटाजवळ झालेल्या अपघाताच्या चौकशीत चालकाचाच निष्काळजीपणा समोर येत आहे. जखमींत चालक हीरा सिंहही आहे. दरीत कोसळण्यापूर्वीच त्याने बसमधून उडी मारली होती. त्याने पोलिसांना सांगितले, बसचे स्टेअरिंग लॉक झाले होते. आता समोर येत आहे की, जिथे बस पडली, तिथे रस्ता खूप रुंद होता. स्टेअरिंग लॉक झाली तरी बस थांबवता आली असती. बसचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. त्यामुळे ती कोसळली.

बातम्या आणखी आहेत...