आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांना बर्फवृष्टीची प्रचंड उत्सुकता असते. परंतु कधी कधी ही बर्फवृष्टी समस्या ठरते. रविवारी काश्मीरमध्ये १० इंचांपर्यंत बर्फ साचला होता. श्रीनगर शहरातही ३ ते ४ इंचांपर्यंत बर्फ साचला होता. त्यामुळे खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले. ३ जानेवारीपासून श्रीनगरहून विमान उड्डाणे रद्द झाली. ३०० किमी लांब जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे हजारो पर्यटक पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगरमध्ये अडकले आहेत. दल सरोवराच्या परिसरातील हाऊसबाेट मालक रस्ते-हवाई मार्ग पुन्हा सुरू होईपर्यंत पर्यटकांना राहण्याची मोफत सुविधा देत आहेत. दुसरीकडे खोऱ्यातील जनजीवनावर बर्फवृष्टीचा प्रभाव पडला आहे. शेकडो घरांची हानी झाली आहे. कुलगाम भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे बुधवारी २२ कुटुंबांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. दक्षिण काश्मीरच्या एका शाळेत त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. श्रीनगरच्या हजरतबल भागात बर्फवृष्टीमुळे एक छत कोसळले. त्यात सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू झाला. उत्तर काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत एका महिलेचा मृत्यू झाला. दिल्ली-एनसीआर भागात गुरुवारपासून पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पेट्रोल, डिझेल, एलपीजीचे रेशनिंग
महामार्गावर पेट्रोल-डिझेलची वाहने अडकल्यामुळे काश्मीरमधील प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पेट्रोल-डिझेलच्या विक्रीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आले. दुचाकी व तीनचाकी वाहनांना ३ ते ५ लिटर पेट्रोल मिळेल. खासगी चारचाकीला कमाल १० लिटर व व्यावसायिक चारचाकींना कमाल २० लिटर मिळेल. बस, ट्रकलाही २० लिटरची परवानगी मिळाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या रिफिलसाठी २१ दिवसांची कालमर्यादा आहे.
सुमारे ६ हजार मालवाहू ट्रक अडकले
वाहतूक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे ६ हजार मालवाहू ट्रक, पेट्रोल-डिझेलचे कंटेनर आणि प्रवासी वाहने अडकली. हे ट्रक लगरोटा बायपास जम्मूूहून उधमपूर, रम्बान, चंदेरकोट यादरम्यान अडकले आहेत. श्रीनगरमधील बहुतांश रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद पडले आहेत.
उत्तर-दक्षिण जिल्ह्यांत वीज संकट
सलग बर्फवृष्टी व वीज पुरवठ्यातील अडथळ्यामुळे काश्मीरच्या उत्तर तसेच दक्षिणेकडील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वीज संकट निर्माण झाले आहे. वीज विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने त्यात सुधारणा होताना दिसत नाही. मुख्य अभियंता एजाज अहमद डार म्हणाले, दक्षिण काश्मीर बर्फवृष्टीमुळे त्रस्त आहे. अनेक ट्रान्सफॉर्मर व वीज व्यवस्था कोलमडली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.