आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:आसामहून मिझोरामचे रस्ते अजून बंदच; संतप्त जमावाला पोलिसांची चिथावणी

मिझोराम-आसाम सीमेवरील वैरंगते-लैलापूर / प्रमोद कुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आसाम-मिझोराममधील रक्तरंजित संघर्षाला आठवडा लोटला आहे. केंद्रीय नेत्यांपासून ते दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच आता कोणताही वाद नसल्याचे सांगत आहेत. आसाम आणि मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी जुन्या गोष्टी विसरून दोन्ही राज्यांत शांतता असून केेंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय दोघांना मान्य असेल, असे संयुक्त वक्तव्यही केले. मात्र या सामायिक विधानाचा जमीन वादावर कोणताही परिणाम झालेला नाही. दोन्ही राज्यांच्या सीमांवरील तणावग्रस्त परिसरातील पोलिस ठाण्यांपर्यंत कोणताही आदेश मिळालेला नाही. परिणामी तणाव पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. मिझोरामची राजधानी आयझोलच्या सीमेवर वादग्रस्त स्थळ वैरंगतेच्या प्रवासात आम्हाला स्पष्टपणे जाणवले की, जनता संतप्त आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे पोलिस हा संताप कमी करण्याऐवजी लोकांना भडकवत आहेत. सीमेवर वाहनांना प्रवेश नाही. मिझोरामला जाणाऱ्या आसामच्या प्रत्येक रस्त्यावर नाकेबंदी आहे. शुक्रवारी रात्रीही आसामच्या कछार जिल्ह्यात मिझोरामला जाणारे चार ट्रक लुटून तोडफोड करण्यात आली. परिस्थिती इतकी बिघडली की, नाकेबंदीमुळे मिझोरामकडे कोरोना तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रिएजेंटचा तुटवडा निर्माण झाला आहे. मिझोराम सरकारने चाचण्या घटवल्या आहेत.

वास्तव जाणून घेण्यासाठी आम्ही मिझोरामची राजधानी आयझोलपासून १८० किमीपर्यंत प्रवास करून दोन्ही राज्यांच्या सीमेवरील वादग्रस्त स्थळ वैरंगतेच्या सीमेपर्यंत गेलो. आयझोलपासून सुमारे ४० किमीपर्यंत गेलो. पुढे रस्त्याच्या कडेला असलेले एक हॉटेल चैंगपुई स्टोअरवर थांबलो. हॉटेलच्या मालक चैंगपुई म्हणाल्या की, तुम्ही चहा घ्या आणि माघारी फिरा. तिकडे आसामवाले घुसू देणार नाहीत. आम्ही कुणाचीही एक इंच जमीन घेतली नाही. परंतु बांगलादेशी खूप वाईट आहेत. ते आमच्या जमिनीवर कब्जा करत आहेत. हे भांडण त्यामुळेच आहे.

आम्ही वादग्रस्त वैरंगते सीमा असलेल्या कोलासिब जिल्ह्यात पोहोचलो. येथे प्रशासनाचे लोक आहेत. परंतु लॉकडाऊन असतानाही ते कुणालाही रोखत नव्हते. ११ वाजता आम्ही वैरंगते वस्तीवर पोहोचलो असता तेथे कोरोना मदत शिबिर सुरू होते. मिझोरामच्या बाजूने पोलिसांसोबत जमाव जमतो ती हीच वस्ती होती. आम्ही कोरोना मदत शिबिरात पोहोचलो. तेथे ६४ वर्षांचे निवृत्त सैनिक छुआना भेटले. त्यांना आम्ही विचारले की, तुम्ही २६ जुलै रोजीच्या घटनेत मिझोरामच्या बाजूने लढाईत उतरले होते का? यावर ते म्हणाले की, आमच्याकडे एकाचाही मृत्यू झाला तर संपूर्ण बाजार बंद राहतो. मग आमची जमीन जात असेल तर चुपचाप कसे बसणार? आम्ही आमच्या जमिनीसाठी लढू. प्राण देऊ पण एक इंचही जमीन कोणाला देणार नाही. आम्ही त्यांना विचारले की, देश तर एकच आहे. मग तुम्ही शत्रूंसारखा व्यवहार का करत आहात? यावर ते म्हणाले की, मी सैनिक आहे. देशाची किंवा प्रदेशाची जमीन देणार नाही. जर असेच असेल तर आमच्या जमिनीवर पोलिस का कब्जा करत आहेत? आमची आर्थिक नाकेबंदी का करत आहेत?. आम्ही उपाशी मरू पण झुकणार नाही. आम्ही हात जोडणार नाही.

जमतो ती हीच वस्ती होती. आम्ही कोरोना मदत शिबिरात पोहोचलो. तेथे ६४ वर्षांचे निवृत्त सैनिक छुआना भेटले. त्यांना आम्ही विचारले की, तुम्ही २६ जुलै रोजीच्या घटनेत मिझोरामच्या बाजूने लढाईत उतरले होते का? यावर ते म्हणाले की, आमच्याकडे एकाचाही मृत्यू झाला तर संपूर्ण बाजार बंद राहतो. मग आमची जमीन जात असेल तर चुपचाप कसे बसणार? आम्ही आमच्या जमिनीसाठी लढू. प्राण देऊ पण एक इंचही जमीन कोणाला देणार नाही. आम्ही त्यांना विचारले की, देश तर एकच आहे. मग तुम्ही शत्रूंसारखा व्यवहार का करत आहात? यावर ते म्हणाले की, मी सैनिक आहे. देशाची किंवा प्रदेशाची जमीन देणार नाही. जर असेच असेल तर आमच्या जमिनीवर पोलिस का कब्जा करत आहेत? आमची आर्थिक नाकेबंदी का करत आहेत?. आम्ही उपाशी मरू पण झुकणार नाही. आम्ही हात जोडणार नाही.

आसाम सीमेवर पोलिस म्हणाले - वरून आदेश आहे की कुणालाही जाऊ देऊ नका
वैरंगते बॉर्डरवर मिझोरामकडून २ वाहनांत २० मजूर येतात. त्यांना गुवाहाटीहून दिल्लीची रेल्वे पकडायची आहे. सीआरपीएफकडून सन्मानपूर्वक मिझोरामचे न्यायाधीश कोलिनसोबत ते सीमा ओलांडतात. त्यांच्या वाहनासोबत आम्हीसुद्धा सीमा ओलांडली. आम्ही आसामच्या लैलापूर ठाण्यात गेलो. पण तेथे पोलिसांनी अधिकाऱ्यांनी मनाई केल्याचे सांगत आम्हाला रोखले. न्यायाधीश कोलिन हे सिल्चरच्या आयुक्त प्रीती जल्ली, एसपी रमनदीप कौर यांना फोन करतात. दोघेही आम्ही कुणालाही सुरक्षा देऊ शकत नाही, असा स्पष्ट नकार देतात. आम्ही त्यांचा वार्तालाप स्पीकरवर ऐकत होतो. जेव्हा आम्ही एसपींना फोन केला तेव्हा त्यांचे म्हणणे होते की, आम्ही सर्वांनाच सुरक्षा देत आहोत. सीएमच्या बैठकीविषयी त्यांना माहीत होते. पण कोणतेही आदेश मिळालेले नव्हते. याचदरम्यान तेथे आसामच्या लोकांची गर्दी होऊ लागते. गर्दीला स्थानिक पोलिस रोखत नाहीत, सीआरपीएफ मागे लोटत होते. आसाम पोलिस मिझोरामच्या मजूर आणि न्यायाधीशांना माघारी पाठवतात.

बातम्या आणखी आहेत...