आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलप्रलय:जयपूरमध्ये रस्त्यांचे बनले तलाव, तरंगू लागल्या कार, 7 तासांत 5 इंच पाणी

जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर : चौडा रास्ता भागात पार्किंगमध्ये बुडालेल्या कार - Divya Marathi
जयपूर : चौडा रास्ता भागात पार्किंगमध्ये बुडालेल्या कार
  • जयपूरमध्ये रस्त्यांचे बनले तलाव, तरंगू लागल्या कार

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. पहाटे ५ वाजेपासून १२ वाजेपर्यंत सुमारे १२५ मिमी (सुमारे ५ इंच) पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक रस्त्यांवर गळ्यापर्यंत पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे अडकलेल्या लोकांना वाहने रस्त्यावरच सोडावी लागली. पाण्याच्या प्रवाहात कार वाहून जात होत्या. प्रशासनाने मदत पथकाच्या साहाय्याने या पूरग्रस्त भागात बचाव मोहीम सुरू केली. हवामान विभागाने शहर आणि राज्यातील काही जिल्ह्यांत एक-दोन दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.

देशाचे हाल | उत्तर प्रदेशात पुन्हा मान्सून सक्रिय झाला. गोरखपूर, बहराइच आणि लखनऊमध्ये चांगला पाऊस झाला. दिल्ली, मुंबईत पावसाने चांगली हजेरी लावली. चोवीस तासांत उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगण येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...