आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Robert Vadra Vs BJP; Congress Rahul Gandhi Parivar Jodo Yatra India | Marathi News

भारत जोडो यात्रेच्या पोस्टरवर वढेरांचा फोटो:ही भारत जोडो नाही तर परिवार जोडो आणि भ्रष्टाचार जोडो यात्रा : भाजप

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी आज पक्षाच्या 'भारत जोडो यात्रे'चे पोस्टर शेअर केले. त्यात काँग्रेस नेत्यांसोबत त्यांचाही फोटो आहे. यावर भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. ही भारत जोडो यात्रा नसून प्रत्यक्षात 'परिवार जोडो' यात्रा असल्याचे भाजपने म्हटले आहे.

रॉबर्ट वढेरा यांनी ट्विटमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे पोस्टर लावत आहेत. पोस्टरवर प्रियंका गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि वढेरा यांचा फोटो आहे. पोस्टरवर काँग्रेस विंग नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे नेते जेबी अभिजीत यांचाही फोटो आहे.

भाजप नेत्यांनी मारला टोमणा
या पोस्टरवरून भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले. त्यांनी ट्विट केले आणि लिहिले – काँग्रेसचे भारत जोडो वास्तवात केवळ परिवार जोडो आणि भ्रष्टाचार जोडो आहे. त्याचवेळी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, रॉबर्ट वढेरा या यात्रेत सामील होत आहेत हे खूपच मनोरंजक आहे. ते म्हणाले, आता भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा दावा करणार का?

राजकारणात येण्याचे दिले होते संकेत
या वर्षी जूनमध्ये रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणात येण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले होते. नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सोनिया गांधी यांची चौकशी केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आली. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, 'या देशात बदलाची गरज आहे. जर लोकांना वाटत असेल की मी देशात आवश्यक बदल घडवून आणू शकतो, तर मी राजकारणात येईन.

भारत जोडो यात्रा मोहिमेपूर्वी राहुल गांधींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
भारत जोडो यात्रा मोहिमेपूर्वी राहुल गांधींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आजपासून सुरुवात
काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात करत आहेत. त्यासाठी त्यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारी गाठली. यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...