आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Robi Shawn The Only Photographer In The World To Reach The Deepest, Longest And Largest Cave In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणादायी:जगातील सर्वात खोल, सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या गुहेपर्यंत फोटो घेण्यासाठी पोहोचला जगातील एकमेव फोटोग्राफर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुहांमध्ये चढण्या-उतरण्याचे कौशल्य शिकण्यासाठी 12 वर्षे उंच इमारतींवर दोराला लटकून केली मजुरी : रॉबी शॉन

मी रॉबी शॉन. १९९९ मध्ये पेंटर होण्याचे स्वप्न घेऊन मी शेफील्डच्या (इंग्लंड) फाइन आर्ट््स काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे मी केव्हिंग टीममध्ये सहभागी झालो. गुहेच्या अंधारात आनंद कसा मिळू शकतो, असा प्रश्न मला पडत असे. पण पहिल्यांदा गेलो तेव्हा आपण पेंटिंग नव्हे, तर गुहांची फोटोग्राफी करावी अशी जाणीव झाली. तेथून माझा प्रवास सुरू झाला.

तेव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते तसेच गुहांच्या फोटोग्राफीला मागणीही नव्हती. हा छंद महागडा होता. कारण, एका गुहेच्या फोटोग्राफीत ३६-३६ रीळ संपत असत आणि अंधारामुळे एकही फोटो येत नसे. दुसरे आव्हान म्हणजे खोल गुहांमध्ये जाण्या-येण्यासाठी दोराच्या साहाय्याने चढता-उतरता आले पाहिजे. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी मी बांधकाम उद्योगात रोप-अॅक्सेसचे काम निवडले. त्यात गगनचुंबी इमारतीत दोरांच्या साहाय्याने लटकून अवजड ड्रिलिंग मशीनद्वारे तासन््तास काम करावे लागते. १२ वर्षे काम आणि वीकेंडला गुहांची फोटोग्राफी सुरू होती. या कामात पैसेही चांगले मिळत असत. त्यामुळे सर्वार्थाने हे काम माझ्यासाठी अनुरूप होते. हे काम प्रचंड आव्हानात्मक आहे. अनेकदा मृत्यूच्या खाईतून मी बाहेर आलो. दोन वर्षांपूर्वी रशियाच्या कॉकेशियन पर्वतांत जगातील सर्वात खोल गुहेचा (८ हजार फूट खोल) फोटो घेण्यास गेलो होतो. गुहेत जाताना असे वाटत होते की जणूकाही माउंट एव्हरेस्टवर उलटी चढाई करत आहे. १२ तास उतरायचो, मग विश्रांती घ्यायचो. १२-१२ तासांच्या क्रमात आम्ही ३ दिवसांत खाली पोहोचलो. चमूत दोन रशियन तज्ञही होते. डॉक्युमेंट्री करता यावी म्हणून आम्हाला १६ दिवस तेथे राहायचे होते. १० व्या दिवशी असे वाटले की जणू एखादी रेल्वे येत आहे. मग पूर आल्याचे कळाले. प्राण वाचवण्यासाठी मेमरी कार्ड वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवले आणि कॅमेरा, लायटिंग आणि इतर साहित्य सोडून बाहेर आलो.

आतापर्यंतच्या प्रवासावरून एवढे सांगू शकतो की, तुमच्या स्वप्नात ताकद आणि कामात जिद्द असेल तर यश मिळतेच, अन्यथा मनापासून न केलेल्या कामाची परिणती दु:खात होऊ शकते. - शब्दांकन : रितेश शुक्ल

८ वर्षे पत्र लिहिल्यानंतर नॅशनल जिऑग्राफीने बोलावले, संपादकाने सर्व फोटो नाकारले, रडूच कोसळले... यश मिळाल्यावर त्याच संपादकाने पुन्हा बोलावले

मजुरी करताना नॅशनल जिऑग्राफिक चॅनलमध्ये (एनजीसी) काम करण्यासाठी हजारो मेल लिहिले. ८ वर्षांनंतर वॉशिंग्टन डीसीला येण्याचे बोलावणे आले. संपादकाने कामाची प्रशंसा केली आणि म्हटले, आणखी मेहनत करा. नवीन पोर्टफोलिओ बनवा. एक वर्षाने नव्या पोर्टफोलिओसह गेलो तेव्हा रडूच कोसळले. कारण, प्रत्येक फोटोवर निगेटिव्ह फीडबॅक मिळाला. सुदैवाने २००८ मध्ये जर्मनीच्या एका नियतकालिकात मला काम मिळाले. तेथे मी ४ वर्षे जगभर भ्रमंती करून ३ असाइनमेंट केल्या. दरम्यान, २०१२ मध्ये नॅशनल जिऑग्राफीच्या त्याच संपादकाकडून मला बोलावणे आले आणि तेव्हापासून आतापर्यंत मी जगातील अनेक दुर्गम गुहांचे छायाचित्रण केले आहे.