आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rocks Fell On The Highway In Kinnaur HRTC Bus And Many Other Vehicles Buried Under Debris

किन्नौरमध्ये पुन्हा डोंगरकडा कोसळला:किन्नौर-हरिद्वारवर बससह अनेक वाहनांवर दरड कोसळली, 40 पेक्षा जास्त प्रवासी ढिगाऱ्याखाली

शिमला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या महिन्यात किन्नौरमध्ये भूस्खलन झाले होते

हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन झाले आहे. किन्नौरहून हरिद्वारकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग -5 वर ज्युरी रोडवर निगोसारी आणि चौरा दरम्यान अचानक डोंगर कोसळला. बस आणि अनेक वाहनांवर दरड कोसळली. रिपोर्ट नुसार, 40 पेक्षा जास्त प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एनडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतली आहे. दरडीखाली अडकलेली बस हरियाणा रोड ट्रान्सपोर्टची होती, जी मुरंगहून हरिद्वारला जात होती.

गेल्या महिन्यात किन्नौरमध्ये भूस्खलन झाले होते
25 जुलै रोजी किन्नौरमध्ये भूस्खलन झाल्यानंतर, टेकडीवरून खडक इतक्या वेगाने खाली पडला होता की बस्पा नदीचा पूल तुटला होता. या अपघातात 9 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 4 राजस्थान, 2 छत्तीसगड आणि महाराष्ट्र आणि पश्चिम दिल्लीतील प्रत्येकी एक होते.
पर्यटक एका प्रवासी कारमध्ये चितकुलहून सांगलाकडे जात असताना बत्सेरी येथील गुंसाजवळील पुलावर खडक पडल्याने पूल तुटला आणि पर्यटक वाहनांचा अपघात झाला.

पोलिस आणि एनडीआरएफच्या टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत
एसडीएम भवानगर मनमोहन सिंग यांनी सांगितले की, ही घटना 12:45 च्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली 40 पेक्षा जास्त प्रवासी अडकले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एनडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतली आहेत.

बातम्या आणखी आहेत...