आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Roelof Van Der Merwe Catch Reminds Kapil Dev's 1983 Match, Latest News And Update

1983 च्या विश्वचषकाच्या आठवणी ताज्या:नेदलँडच्या मर्व्हने कपिसारखा झेल पकडला, स्वतःच्याच खेळाडूमुळे द.आफ्रिका स्पर्धेबाहेर

स्पोर्ट्स डेस्क24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकातील पूल-2च्या सामन्यात 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासारखा एक अप्रतिम क्षण पहावयास मिळाला. त्या सामन्यात कपिल देवने मागच्या दिशेने धावत जात व्हिव्हियन रिचर्ड्सचा जादुई कॅच घेऊन वेस्ट इंडिजची राजसत्ता संपुष्टात आणली होती. अगदी त्याच अंदाजात नेदरलंडच्या मर्व्हने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा झेल पकडला.

टी-20 विश्वचषकामधील दक्षिण आफ्रिकेचा प्रवास रविवारी संपुष्टात आला. नेदरलँडने ग्रुप-2च्या एका सामन्यात आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव करून त्याला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर केले. विशेष गोष्ट म्हणजे आफ्रिकेला बाहेर करण्यात सर्वात मोठा हात त्याच्याच देशात जन्मलेल्या, पण नेदरलँडकडून खेळणाऱ्या 37 वर्षीय अष्टपैलू रोल्फ वान डेर मर्व्हचा आहे.

मोठ्या खेळीची अपेक्षा असताना मिलर बाद

मर्व्हने अत्यंत महत्वाच्या क्षणी डेव्हिड मिलरचा करिश्माई झेल पकडला. यावेळी दक्षिण आफ्रिकेला मिलरकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा होती. आफ्रिकेचा संघ 4 गडी बाद 90 धावांवर होता. संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी मिलरवर होती. मिलरने भारताविरोधात याच स्थितीत संघाला विजय मिळवून दिला होता.

नेदरलँडविरोधात मिलर बाद झाला तेव्हा संघाला विजयासाठी 5 षटकांत 48 धावा हव्या होत्या. त्यामुळे मिलर क्रीजवर राहिला असता तर आफ्रिकन संघाला 159 धावांचे आव्हान सहज पार करता आले असते. पण रोल्फने मिलरचा कॅच पकडून नेदरलँडला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

आफ्रिकेच्या डावातील 16 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिलरने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या किनाऱ्याला लागून हवेत उंच गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर उभ्या असणाऱ्या रोल्फने मागच्या दिशेने धावत जात हा झेल पकडला. मिलर बाद होताच दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. अखेरीस नेदरलँडने सामना 13 धावांनी आपल्या नावे केला.

1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कपिल देवने व्हिव्हियन रिचर्ड्सचा असाच झेल घेतला होता.
1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कपिल देवने व्हिव्हियन रिचर्ड्सचा असाच झेल घेतला होता.

1983 च्या त्या झेलमुळेच भारत विश्वविजेता बनला होता

मर्व्हच्या कॅचमुळे 1983 च्या विश्वचषकातील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज फायनलच्या आठवणी ताज्या झाल्या. कपिलच्या त्या कॅचमुळे टीम इंडियाने क्लाइव्ह लॉयडच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा फायनलमध्ये पराभव केला होता. व्हिव्हियन रिचर्ड्सच्या या झेलमुळे भारताने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

चांगल्या फॉर्मात होते रिचर्ड्स

1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या डावाची चांगली सुरूवात झाली नव्हती. त्यांचा पहिला बळी गॉर्डन ग्रीनिजच्या रुपात अवघ्या 5 धावांवर पडला होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स व डेसमंड हेंसने 45 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हेंस बाद झाला.

त्यानंतर कर्णधार क्लाइव्ह लॉयड फलंदाजीसाठी आला. व्हिव्हियन रिचर्ड्स 7 चौकारांसह 33 धावांवर खेळत होता. त्याला लॉयड चांगली साथ देत होता. त्यांची खेळी पाहून वेस्ट इंडिज टीम इंडियाचा सहजपणे पराभव करेल असे वाटत होते. कारण, रन रेटही साडेतीन रन प्रतिओव्हरहून कमी होते.

कपिलने 18 मीटर मागे धावत झेल घेतला

भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी व्हिव्हियनला तंबूत पाठवणे आवश्यक होते. व्हिव्हियन कोणत्याही वेळी सामन्याचा नूर पालटण्यात तरबेज होता. कपिल देवने मदन लालच्या हातात चेंडू दिला. मदन लालने ऑफ स्टंपवर गुडलेंत बॉल टाकला. रिचर्ड्सने मिड विकेटवर पुल शॉट खेळला. पण चेंडू टॉप एजला लागून उंच उडाला. मिड ऑनवर उभ्या कपिल देवने जवळपास 18 मिटर मागे धावत जाऊन एक अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाला आकार आला नाही. त्यांचा संपूर्ण संघ 52 षटकांत 140 धावांवर बाद झाला.

कपिल देवच्या कॅचमुळे वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 140 धावांवर सर्वबाद झाला.
कपिल देवच्या कॅचमुळे वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 140 धावांवर सर्वबाद झाला.

रोल्फ आफ्रिकेकडून खेळला

रोल्फ वान डेर मर्व्हचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता. त्याने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. त्याने आफ्रिकेसाठी 13 वन डे व तेवढेच टी-20 सामने खेळले. 2015 मध्ये त्यांना डच पासपोर्ट मिळाला. त्यानंतर त्याचवर्षी त्याने नेदरलँडसाठी डेब्यू केले. नेदरलँडसाठी त्याने आतापर्यंत 36 टी-20 व 3 एकदिवसीय सामने खेळलेत.

आफ्रिकेला विजयासाठी हव्या होत्या 159 धावा

आफ्रिकन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या. त्यांच्यातर्फे एकरमॅनने सर्वाधिक 41 धावा केल्या. त्याने 26 चेंडूच्या आपल्या खेळीत 3 चौकार व 2 उत्तुंग षटकार खेचले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेला 8 गडी बाद 145 धावाच करता आल्या. यामुळे या संघाला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.

बातम्या आणखी आहेत...