आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुडाना गावची शनैन ढाका एनडीएन परीक्षा उत्तीर्ण होणारी देशातील पहिली मुलगी कन्या ठरली आहे. सरकारने मुलींना एनडीएत प्रवेश देण्याची घोषणा केल्यानंतर झालेल्या या परीक्षेतून शनैनसह देशभरातील अवघ्या 2 मुलींची निवड झाली आहे. शनैनने मुलींमध्ये अव्वल येत 10 वी रँक मिळवली आहे. तिच्या यशामुळे तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
शनैनचे वडील व मोठी बहीण सैन्यात आहेत. या दोघांकडे पाहून तिने एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 40 दिवस दररोज 10 ते -12 तासांची तयारी करून तिने ही लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. वडील विजय कुमार यांनीही मुलीला सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित केले.
UPSC सुरू होती तयारी
शनैनने सांगितले की, ती यूपीएससीची तयारी करत होती. महिलांना एनडीएमध्ये प्रवेशाची परवानगी मिळताच तिनेही अर्ज केला. त्यानंतर तिला तयारी करण्यासाठी अवघे 40 दिवस मिळाले. 14 नोव्हेंबरला परीक्षा झाली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 5 दिवसांच्या मुलाखतीतही तिने चांगली कामगिरी केली. त्यानंतर तिची एनडीएमध्ये निवड झाली. शनैन दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे.
मागील वर्षांचे पेपर वाचून झाली पास
शनैनने सांगितले की, एनडीए परीक्षेपूर्वी तिने मागील जवळपास 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या. त्या प्रश्नपत्रिका वाचून स्वतः सोडवल्या. परीक्षेसाठी अडीच तासांचा वेळ देण्यात दिला जातो. पण, तिने 2 तासांत पेपर सोडवण्याचे लक्ष ठेवले होते. याचा फायदा तिला प्रत्यक्ष परीक्षेत झाला.
SSB मुलाखतीत नाटक चालत नाही
शनैनने सांगितले की, 5 दिवस चाललेल्या एसएसबी मुलाखतीत सर्वांचे व्यवहार बारकाईने तपासला जातो. त्यामुळे कुणीही खोटे बोलू नये. स्वतःशी प्रामाणिक रहावे. मी असे केल्याने माझी मुलाखत चांगली झाली. मुलाखतीला कोणत्याही दबावाशिवाय सामोरे जाण्याचा सल्लाही तिने दिला.
मोठी बहीण लष्करात अधिकारी
शनैननेच वडील विजय कुमार माजी सैनिक आहेत. त्यांना 3 मुली आहेत. शनैन मधवी आहे. मोठी बहीण जोनून ढाका लष्करात परिचारिका पदावर तैनात आहे. तिचे प्रशिक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. तर छोटी बहीण अशी सध्या पाचवीत शिक्षण घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.