आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लाॅकडाऊनमुळे मानवी हस्तक्षेप घटल्यानेजिम काॅर्बेटमध्ये वाघांच्या मुक्त डरकाळ्या, 74 वर्षांनंतर पहिल्यांदाच बंगाल टायगर्सची शाही भटकंती

रामनगर, उत्तराखंड (एम. रियाझ हाश्मी )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात जुन्या जिम काॅर्बेट व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांचे साम्राज्य जाणवू लागले आहे. लाॅकडाऊनमुळे मानवी हस्तक्षेप बंद झाला. त्यामुळे बंगाल टायगर्सला देखील १२ चाैरस किमी क्षेत्रफळात मुक्त विहार करता येत आहे. चांगल्या संगाेपनामुळे या राष्ट्रीय प्रकल्पातील वाघांची संख्याही वाढली आहे. २०१४ मध्ये २१५ वाघ हाेते. आता ही संख्या २६० झाली आहे.

रामगंगा खाेऱ्यात १३१८.५४ चाैरस किमी क्षेत्रफळात जिम काॅर्बेट राष्ट्रीय उद्यान असून त्यात ८२१.९९ चाैरस किमी भाग वाघांसाठी राखीव आहे. ७४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रकल्प १७ मार्च पासून १२ जून एवढा प्रदीर्घ कालावधी पर्यटकांसाठी बंद राहिला. अनलाॅक-१ मध्ये ८ जूनपासून हा प्रकल्प हळूहळू सुरू हाेत हाेता. परंतु, पर्यटक नव्हते. कारण देशातील ३१ काेराेना पीडित शहरांतील पर्यटकांवर प्रवासाची बंदी आहे. आता मान्सून आला. म्हणूनच ढिकाला, दुर्गादेवी हा भाग बंद ठेवला असून बिजरानी, ढेला, झिरना, पांखराे हा भाग दिवसा खुला करण्यात आला आहे. वाइल्ड लाइफ फाेटाेग्राफर डाॅ. विवेक बॅनर्जी म्हणाले, राॅयल बंगाल टायगरला पारंपरिक वस्तीस्थान मिळाल्याने त्याचा शाही वावर पाहण्याजाेगा आहे. तीन महिन्यांत हस्तक्षेप नसणे हे त्यामागील माेठे कारण आहे. भारतीय वनसेवेतील अधिकारी सुनील चाैधरी म्हणाले, एक वाघ १२ चाैरस किमी भागात वास्तव्य करताे. त्यात तीन-चार वाघिणी असतात. मात्र, वास्तव्य भागांत दाटीवाटी असेल तर वाघांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष दिसताे. तीन महिन्यांत अशी धुमश्चक्री झाली नाही. सामान्यपणे वाघ चराई क्षेत्राच्या जवळ शिकारीसाठी राहतात.

वाघाची संख्या वाढली, पण यंदा निधीत कपात
उद्यानाचे संचालक राहुल म्हणाले, जिम कॉर्बेटमधील वाघांची संख्या वाढली. मात्र काेराेनामुळे वार्षिक निधी १४ काेटी करण्यात आला आहे. आधी तो १७ कोटी होता.

बातम्या आणखी आहेत...