आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rs 125 Coin: PM Narendra Modi To Release Special Commemorative Coin On ISKCON Founder 125th Birth Anniversary Today

स्वामी प्रभुपाद जयंती:पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 125 रुपयांचे स्मृती नाणे जारी करणार, व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून करणार जनतेला संबोधित

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थापनेच्या 11 वर्षानंतरच अनेक देशांमध्ये पसरले इस्कॉन आंदोलन

भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 125 रुपयांचे विशेष स्मारक नाणे जारी करणार आहेत. या दरम्यान, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका सभेला संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, सोहळा संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होईल. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

स्वामी प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केली होती. याला सामान्यतः हरे कृष्ण चळवळ म्हणून ओळखले जाते. इस्कॉनने गीता सारख्या वैदिक साहित्याचा जगभर प्रसार केला. तसेच त्यांना 89 भाषांमध्ये अनुवादित केले. स्वामी प्रभुपादांनी 100 हून अधिक मंदिरांची स्थापना केली आणि जगाला भक्ती योगाचा मार्ग दाखवणारे अनेक ग्रंथ लिहिले.

स्थापनेच्या 11 वर्षानंतरच अनेक देशांमध्ये पसरले इस्कॉन आंदोलन
इस्कॉन वेबसाईट नुसार, हे ब्रह्मा माधव गौडिया वैष्णव संप्रदायाचा एक भाग आहे, जे चार वैष्णव पंथांपैकी एक आहे. इस्कॉनची शिकवण आणि पद्धती चैतन्य महाप्रभु (1486-1532) यांनी त्यांचे बंधू नित्यानंद प्रभू आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांसह शिकवल्या होत्या. इस्कॉन चळवळीच्या स्थापनेनंतर अवघ्या 11 वर्षांत, हे जगभरातील अनेक देशांमध्ये पसरले.

बातम्या आणखी आहेत...