आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rs 300 Crore Loss For Travancore Board, It Will Convert Gold Into Cash To Alleviate Losses

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:1250 मंदिरांचे संचालन करणाऱ्या त्रावणकोर बोर्डाचे 300 कोटींचे नुकसान, चणचण दूर करण्यासाठी सोन्याचे रोखीत रूपांतर करणार

केपी सेतुनाथ | कोची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिरुमला बोर्ड जम्मूत भव्य व्यंकटेश्वर मंदिर उभारणार
  • त्रावणकोर बोर्ड सुवर्ण रोखे योजनेत 1000 कि.ग्रॅ. सोने देऊ शकते, आकलन सुरू

केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिराचा कार्यभार पाहणारे त्रावणकोर देवस्वाम बोर्ड चणचण दूर करण्यासाठी आपल्या सोन्याचे रोखीत रूपांतर करणार आहे. तर तिरुमला देवस्थानम बोर्ड जम्मूमध्ये भव्य व्यंकटेश्वर मंदिरही उभारणार आहे. त्रावणकोर देवस्वाम बोर्ड भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण रोखे योजनेत सहभागी होणार आहे. बोर्डाच्या देशातील १२५० मंदिरांचे कामकाज योग्य पद्धतीने होणे यामागील हेतू आहे. योजनेअंतर्गत बोर्डाला जमा केलेल्या सोन्याच्या मोबदल्यात २.५ % वार्षिक व्याज मिळेल.

त्रावणकोर देवस्वाम बोर्डाचे अध्यक्ष एन. वासू यांनी सांगितले, यासाठी केरळ उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. सध्या बोर्डाकडून सोन्याचे प्रमाण जाणून घेतले जात आहे. एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आम्हाला आशा आहे. कोरोना महामारीमुळे मंदिर बंद झाल्याने बोर्डाचे सुमारे ३०० कोटींचे नुकसान झाले आहे. मंदिरांकडे पूजा व विधींसाठी प्राचीन दागिने आहेत. यांचा यात समावेश होणार नाही. मात्र बोर्डाची सर्व मंदिरे पाच महिन्यांनंतर भा‌विकांसाठी १७ ऑगस्टला उघडली आहेत. सध्या भाविकांची संख्या मर्यादित आहे. सद्य:स्थितीत बोर्डाकडे एकूण किती सोने आहे हे सांगणे शक्य नाही, कारण आकलन प्रक्रिया सुरू आहे. किमान एक हजार किलोग्रॅम सोने असण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून १२५० मंदिरांचा कार्यभार पाहिला जातो. सध्या ३५०० कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान बोर्डाला दरवर्षाला सबरीमाला मंदिरांकडून सर्वात जास्त देणगी मिळते. २०१९-२० मध्ये मंदिराने तीर्थयात्रा हंगामात २६३.५८ कोटींचे उत्पन्न मिळ‌वले होते. तसेच २०१८-१९ या वर्षामध्ये बोर्डाला मंदिराकडून १७९.२३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

१०० एकरांत असेल तिरुपती बालाजी मंदिर, रुग्णालयही उभारणार

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्ड जम्मूू-कटरा महामार्गावर भव्य व्यंकटेश्वर मंदिर उभारणार आहे. यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने महामार्गावर सुमारे १०० एकर जमीन देण्यास सहमती दर्शवली आहे. बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही.सुब्बा रेड्डींनी सांगितले, हे मंदिर उभारल्यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक भगवान व्यंकटेश्वरांचेही दर्शन घेऊ शकतील. जम्मूमध्ये मंदिराशिवाय रुग्णालय, वैदिक शाळा इत्यादी उभारले जाणार आहे.