आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरात वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत ४०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. दक्षिणेकडील राज्यांत वैद्यकीय महाविद्यालये हुशार विद्यार्थ्यांना ‘नीट’ला बसवतात, पण उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत. त्यामुळे जागा रिक्त राहतात. त्यानंतर ही महाविद्यालये रिक्त राहिलेल्या नियमित जागा दलालांच्या मदतीने राज्य समुपदेशन समितीकडून व्यवस्थापन कोट्यातील पेड सीटमध्ये रूपांतरित करून घेतात. आणि नंतर या जागांवर इतर विद्यार्थ्यांना डोनेशनची मोठी रक्कम घेऊन प्रवेश देतात. प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांत हा प्रकार उघडकीस आला आहे.
बंगळुरूच्या नऊ ट्रस्टनी समुपदेशन प्रक्रियेत गडबड करून हा घोटाळा केला आहे. कर्नाटक आणि केरळच्या ५६ ठिकाणी दोन दिवस चाललेल्या कारवाईनंतर ईडीही चौकशीत सहभागी झाले. ट्रस्टींच्या घरांतून ८१ किलो सोन्याचे दागिने, ५० कॅरेटचे हिरे आणि ४० किलो चांदी जप्त झाली. घानामध्ये २.३९ कोटी रुपयांच्या अघोषित विदेशी मालमत्तेशिवाय बेनामी ३५ लक्झरी कारमध्ये प्रचंड गुंतवणूक केल्याचे पुरावेही मिळाले आहेत. विदेशातही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.