आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • RSS Chief Mohan Bhagwat| 80 Percent Of Fund Allocated To J&K Went To Politicians Before Article 370 Abrogation

काश्मीरच्या नेत्यांवर संघ प्रमुखांचा हल्ला:कलम 370 हटवण्यापूर्वी जम्मू-काश्मीरचा 80% फंड नेत्यांच्या खिशात जात होता, सरसंघचालक मोहन भागवतांचे वक्तव्य

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याविषयी केले होते भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत आपले मत मांडले आहे. काश्मीरच्या नेत्यांवर निशाणा साधत ते म्हणाले की, कलम 370 रद्द करण्यापूर्वी जम्मू -काश्मीरसाठी वाटप केलेल्या निधीपैकी 80% निधी येथील नेत्यांच्या खिशात जात होता.

शनिवारी नागपुरात एका पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले- '370 कलम हटवण्यापूर्वी काश्मीरच्या नावाने जे काही केले गेले, त्यातील 80% भाग येथील नेत्यांच्या खिशात गेला. तो लोकांपर्यंत पोहोचला नाही. आता हा कलम काढून टाकल्यानंतर, स्थानिक लोकांना प्रथमच अनुभव येत आहे की विकासाशी जुळणे काय आहे आणि सरकारी लाभ कसे मिळतात.'

काश्मीरला संपूर्ण देशाशी जोडले पाहिजे
ते म्हणाले की काश्मीर खोऱ्यात अजूनही काही लोक आहेत ज्यांना वाटते की भारतापासून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यामुळे त्यांना देशाच्या इतर भागांशी जोडण्यासाठी आपल्याला सर्व प्रयत्न करावे लागतील. जसे शरीराचे सर्व अवयव एकमेकांशी जोडलेले असतात.

मोहन भागवत म्हणाले- 'मी काही काळापूर्वी जम्मू-काश्मीरला गेलो होतो, जेव्हा तेथील परिस्थिती पाहिली. कलम 370 रद्द केल्यानंतर सर्वांसाठी विकासाचा मार्ग खुला झाला आहे. पूर्वी जम्मू आणि लडाखच्या लोकांना भेदभावाचा सामना करावा लागत होता, पण आता तसे नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याविषयी केले होते भाष्य
दोन दिवसांपूर्वी विजयादशमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, मी जम्मू -काश्मीरला जाऊन आलो आहे. तेथील कलम 370 हटवल्यानंतर सामान्य जनतेला चांगले फायदे मिळत आहेत, पण खोऱ्यात हिंदूंची टार्गेट किलिंग केली जात आहे. दहशतवाद्यांच्या हालचालींचा बंदोबस्त करावा लागेल, जसा पहिले केला जात होता. ते घाबरवण्यासाठी लक्षित हिंसा करत आहेत. भीती निर्माण करणे हेच त्यांचे ध्येय आहे. सरकारलाही याची काळजीपूर्वक व्यवस्था करावी लागेल.

कलम 370 दोन वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आले होते
मोहन भागवत यांनी शनिवारी दोन पुस्तके लॉन्च केली. आधुनिक लद्दाखछे निर्माता एकोनिसावे कुशोक बालुका आणि जम्मू-कश्मीर: ऐतिहासिक परिप्रेख्मे धारा 370 के संशोधन के उपरांत. ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू -काश्मीरच्या लोकांना विशेष अधिकार देणारे कलम 370 काढून टाकले आणि त्याचे जम्मू -काश्मीर आणि लडाखमध्ये विभाजन केले.

बातम्या आणखी आहेत...