आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • RSS Chief Mohan Bhagwat Meets Shivraj Singh Chouhan Cabinet Ministers Today In Bhopal

सरसंघचालक भोपाळमध्ये:सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्र्यांची भेट; ज्योतिरादित्य समर्थकांना बोलावलेच नाही

भोपाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सध्या भोपाळमध्ये आहेत. तीन दिवसांच्या भोपाळ दौऱ्यासाठी ते सोमवारी रात्रीच या ठिकाणी पोहोचले. आपल्या दौऱ्यात ते मध्य प्रदेशातील संघाच्या कोअर ग्रुप प्रमुख अर्थात विचारकांच्या बैठका घेत आहेत. या बैठकांचा अजेंडा जाहीर केला जात नाही. माध्यमांना काय माहिती द्यावी हे या बैठका सुरू असतानाच ठरवले जाते. याच दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचालक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्र्यांसोबत एक-एक करून चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीसाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना बोलावलेले नाही.

मंत्र्यांना भोपाळमध्ये राहण्याचे आदेश

सरसंघचालक सध्या भोपाळमध्ये असल्याने भाजपने राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांना राजधानीतच राहण्याचे आदेश दिले आहेत. याच दरम्यान, भागवत यांनी मंगळवारी दुपारी मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांना बैठकीसाठी शारदा विहारला बोलावले. यामध्ये त्यांच्यासोबत तासभर चर्चा देखील केली. यानंतर उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांच्याशी बातचीत केली. बुधवारी सुद्धा सरसंघचालक इतर मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत.

संघाशी संबंधित मंत्र्यांना प्राधान्य

सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्या मंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले ते सगळेच स्वतः स्वयंसेवक आहेत किंवा संघाशी संबंधित आहेत. भागवत यांची भेट घेऊन चर्चा करणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा देखील समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, सरसंघचालक जेव्हा भोपाळला येतात, तेव्हा ते नेहमी अरेरा कॉलनी येथील संघाच्या कार्यालयात मुक्काम करतात. परंतु, यावेळी या ठिकाणी राहणाऱ्या तीन प्रचारकांना कोरोना झाल्याने सरसंघचालक येथे थांबले नाहीत. सोबतच, भागवत यांची भेट घेणाऱ्या सर्वांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. तसेच त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री देखील तपासून पाहिली जात आहे.