आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्तर प्रदेशच्या याेगी आदित्यनाथ सरकारची कॉस्मेटिक सर्जरी करू इच्छितो. आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सरकारचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. संघाच्या इच्छेनुसार योगी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तयारी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळातील सहा जागांवर नवे चेहरे दिसू शकतात. समाजातील असंतुष्ट वर्गाला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. मध्य प्रदेशातील चित्रकूटनंतर गेल्या आठवड्यात लखनऊमध्ये संघाची बैठक झाली होती. त्यात भाजपचे प्रदेश नेते सहभागी झाले होते. चिंतन-मंथनानंतर साेमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. त्याचे स्वरूपही ठरले आहे. विस्तार कधी केला जाणार याचा निर्णय योगी घेतील. परंतु या महिनाअखेरीस नवे मंत्री शपथ घेतील. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ७५ वर्षीय एक-दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाऊ शकतात. पक्षाने त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. भाजप नव्या मंत्र्यांची नावे व हटवण्यात येणाऱ्या मंत्र्यांमुळे राजकीय लाभ-हानीचे गणित करण्यात व्यग्र आहे. मंत्रिमंडळ विस्तारातून सामाजिक न्यायाचा स्पष्ट संदेश जावा याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.