आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • RSS Garbh Sanskar Campaign Launches; Unborn Babies Teach Bhagavad Gita, Ramayana | Garbh Sanskar

गर्भातच मुलाला गीता-रामायण ऐकवले जाईल:RSS-संलग्न संस्थेने गर्भसंस्कार अभियान केले सुरू; मुलांना भारतीय संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवर्धिनी न्यास या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखेने आईच्या पोटातच मुलांना संस्कार देण्यासाठी ‘गर्भ संस्कार’ मोहीम सुरू केली आहे. यामध्ये गरोदर महिलांना गीता, रामायण, शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन आणि संघर्ष याविषयी माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून गर्भात वाढत असलेल्या बाळाला भारतीय संस्कृतीची माहिती देता येईल.

रविवारी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) येथे संवर्धिनी न्यासच्या एका कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. त्या वेळी एम्ससह 12 राज्यांतील 70-80 डॉक्टरही उपस्थित होते. जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बनवण्यात आले होते. मात्र, त्या कार्यक्रमात पोहचल्या नाहीत.

या मोहिमेत स्त्रीरोग तज्ज्ञ, आयुर्वेदिक डॉक्टर आणि योग प्रशिक्षकांचा सहभाग आहे. त्या गरोदर महिलांकडे जाऊन त्यांना गीता आणि रामायण वाचण्यास आणि योगासने करण्यास प्रेरणा देतील. आपल्या मुलाला गर्भात भारतीय संस्कृतीबद्दल शिकवण्याबद्दल सांगितले जाईल.

हे पोस्टर जेएनयूमध्ये 5 मार्च रोजी झालेल्या गर्भसंस्कार कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आहे.
हे पोस्टर जेएनयूमध्ये 5 मार्च रोजी झालेल्या गर्भसंस्कार कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे आहे.

गर्भात बाळ 500 शब्द शिकू शकते
राष्ट्रीय संघटन सचिव माधुरी मराठे म्हणाल्या की, महिलांनी गर्भारपणातच बालकांना संस्कार देण्याचे काम सुरू केले पाहिजे. आईच्या पोटात मुल 500 शब्द शिकू शकते, असे त्यांनी सांगितले. ही मोहीम महिलेच्या गरोदरपणापासून सुरू होणार असून, मूल दोन वर्षांचे होईपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेद्वारे 1000 महिलांपर्यंत पोहोचण्याची योजना आहे.

माधुरी मराठे यांनी जिजाबाईंचे उदाहरण दिले. त्यांनी नेत्याला जन्म देण्याची प्रार्थना कशी केली. आज भारतातील मातांनी जिजाबाईंप्रमाणे प्रार्थना करावी, जेणेकरून हिंदू राज्यकर्त्यांचे गुण त्यांच्या मुलांमध्ये रुजावेत.

एम्सच्या एनएमआर विभागाचे प्रमुख डॉ. रामा जयसुंदर म्हणाले की, अपंग आणि ऑटिझम असलेल्या मुलांची संख्या वाढत आहे. हे अशा पालकांच्या बाबतीत घडते जे आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि आरामदायी जीवन जगतात. जेव्हा जोडप्याने मुलाचा विचार केला, तेव्हाच गर्भसंस्काराचा कार्यक्रम सुरू होतो. त्यांनी सांगितले की, महिलांनी गरोदरपणात संस्कृतचा अभ्यास केला पाहिजे.

गर्भधारणेपासून मुलाचा डीएनए बदलला जाऊ शकतो
गर्भसंस्कार योग्य पद्धतीने केल्यास गर्भातील बालकाचा डीएनएही बदलता येऊ शकतो, असा दावा जयसुंदर यांनी केला. ते म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे. आजकाल मुलं आई-वडिलांची हत्या करत असल्याच्या बातम्या येतात. बलात्काराच्या घटना वाढत आहेत. स्त्रिया जर रामसारख्या मुलांना जन्म देतील तर त्यांना आनंद होईल.

असा उपक्रम 2014 मध्ये मध्यप्रदेशात सुरू झाला
असाच एक उपक्रम ऑक्टोबर 2014 मध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुरू करण्यात आला होता. भोपाळच्या गर्भसंस्कार तपोवन केंद्राने दावा केला आहे की, हिंदू संस्कार आणि गर्भसंवादाद्वारे गर्भवती महिलांना निरोगी मुलाला जन्म देण्यास मदत केली जाते. येथे गरोदर महिलांचा संपूर्ण कोर्स नऊ महिन्यांचा आहे.

ज्यामध्ये महिलांना भारतीय संस्कृती, गर्भधारणेपूर्वीची तयारी, ध्यान, मंत्र, प्रार्थना, गर्भसंवाद याविषयी सांगितले आहे. या केंद्राची प्रेरणा गुजरातच्या बालविद्यापीठातून घेतली गेली. असाच एक उपक्रम गुजरातमध्येही सुरू करण्यात आला, ज्याचे चांगले परिणाम दिसून आले.

आयुर्वेदातील एक गर्भसंस्कार​​​​​​​

​​​​​​​स्त्रीचे आरोग्य चांगले नसेल, मातृत्व मुळात सर्व दृष्टीने सुदृढ नसेल तर पुढील पिढी चांगली असूच शकणार नाही. स्त्रीच्या आरोग्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आली आहे. कारण आई-वडील, विशेषत: आईची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम असेल तरच जन्माला येणारे मूल सुदृढ, हुशार, निरोगी निघेल. बुद्धिमान आणि आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत, तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठीचे योग्य वय काय इथंपासून पती-पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी, बीजशुद्धी कशी करून घ्यावी, अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणे आवश्यक ठरते.​​​​​​​ येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...