आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह पदी दत्ताजी होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 2009 पासून भैय्याजी जोशी हे सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेंगळुरू येथील अखिल भारतीय प्रतिनिधीक संभेत नव्या सरकार्यवाहांची निवड करण्यात आली आहे.
शनिवारी सर्वसंमतीने सह-सरकार्यवाह राहिलेले दत्तात्रेय होसबळे यांना ही जबाबदारी देण्यात आली. होसबळे केवळ 2024 च्या निवडणुकीपर्यंतच नव्हे, तर 2025 मध्ये संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सुद्धा RSS चे संघटनात्मक नियंत्रण करतील.
कोरोनामुळे यंदा 1000 प्रतिनिधींची व्हॅर्चुअल उपस्थिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्नाटकमधील बंगळुरू येथे शुक्रवारपासून दोन दिवसीय सभा झाली. यंदा कोरोनामुळे तीन दिवसांऐवजी दोन दिवसांचीच बैठक आयोजित करण्यात आली. दरवेळी या सभेत 1500 प्रतिनिधी सहभागी होत असतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यावेळी फक्त 450 प्रतिनिधी बेंगळुरूत होते. तर 1000 प्रतिनिधींनी 44 ठिकाणांवरून व्हर्चुअल सहभाग घेतला.
प्रथमच नागपूरबाहेर आयोजन
प्रतिनिधी सभेचे आयोजन दर तीन वर्षांनी नागपुरातच करण्यात येते. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात प्रथमच अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन नागपूर बाहेर करण्यात आले.
नव्याने निवड करण्यात आलेले दत्ताजी होसबळे हे 2009 पासून सहसरकार्यवाह म्हणून कार्यरत होते. सरसंघचालकानंतर सरकार्यवाह हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. तीन वर्षांपूर्वी 2018 मध्ये भैय्याजी जोशी यांनाी पद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकाळात 3 वर्षांची वाढ करण्यात आली होती. सरकार्यवाह या एकमेव पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यकारी अधिकार हे "सरकार्यवाह' यांना असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.