आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • RSS Secret Meeting; RSS Meeting In Chitrakoot, Ayodhya Ram Temple, UP Assembly Election 2022 Planning, UP Assembly Election 2022

संघाची गुप्त बैठक एक्सक्लूसिव्ह:चित्रकूटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंथनावर इनसाइड स्टोरी, सरकारसाठी धर्म, संस्कृती आणि राजकीय विषयावर मास्टर प्लॅनची तयारी

चित्रकूटएका वर्षापूर्वीलेखक: संध्या द्विवेदी
  • कॉपी लिंक
  • संघाच्या गुप्त बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर होत आहे चर्चा?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील दीनदयाल उपाध्याय रिसर्च फाउंडेशनमध्ये बैठक सुरू आहे. ही बैठक किती गुप्त ठेवण्यात आली ते या सभोवतालच्या बंदोबस्तावरून समजता येईल. ज्या ठिकाणी बैठक आहे, तेथील 3 किमी परिसरात बॅरिकेड लावण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील 5 जिल्हे सतना, सीधी, शहडोल, बांदा आणि चित्रकूटमध्ये पोलिस पहारा देत आहेत. बैठकीत प्रत्यक्ष किंवा व्हर्चुल पद्धतीने सहभागी झालेल्या कुठल्याही सदस्याने आतील गोष्टी लीक करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भास्करच्या सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील विविध मुद्द्यांवर मास्टर प्लॅन तयार करण्याच्या दिशेने ही बैठक घेतली जात आहे. धर्म, संस्कृती आणि राजकारण या तीन विषयांवर संघाचे मंथन सुरू आहे.

संघासमोर 4 प्रश्न
1. संघाने खरंच धर्मनिरपेक्षता दाखवण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे का?
2. धर्मनिरपेक्षा इमेज तयार झाल्यास केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यात मदत मिळेल का?
3. भाजपच्या ठरलेल्या मतदारांवर संघाच्या धर्मनिरपक्ष इमेजचा काही परिणाम होईल का?
4. देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास सेवा कार्यात संघाची भूमिका कशी राहील?

5 मुद्द्यांवर चर्चा करून सरकारसाठी बनणार संघाचे संविधान

1: धर्म परिवर्तनाच्या विरोधात कठोर कायद्यावर एकमत
धर्म परिवर्तनावर केंद्राने कठोर कायदा आणावा यावर बैठकीत एकमत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संघ मोदी सरकारसमोर हा प्रस्ताव ठेवणार आहे. धर्म परिवर्तनाच्या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद हवी. परंतु, धर्म परिवर्तन विरोधातील कायदा आताच पास करून लोकसभा निवडणुकीत यश म्हणून सादर करण्यात यावे, की 2024 च्या आश्वासनात तो नमूद करण्यात यावा यावर दुमत आहे.

2: धर्म परिवर्तन थांबवण्यासाठी कायदा आणि घरवापसी
या बैठकीत धर्म परिवर्तन थांबवण्यासह कायद्यानुसार कारवाई किती कठोर किंवा सौम्य असावी यावरही चर्चा झाली. संघातील सूत्रांच्या माहितीनुसार, मुस्लिम झालेला मोठा वर्ग स्वतः घरवापसी करण्यास इच्छुक आहे. यासाठी सक्ती असू नये. चर्चेवरून येत्या काळात धर्म परिवर्तनाच्या उलट्या लाटेची प्रकरणे सुद्धा समोर येऊ शकतात.

3: लोकसंख्या नियंत्रण कायदा
देशात संघाने वेळोवेळी मुस्लिमांच्या वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय असल्याचे मांडले आहे. त्यामुळे, केंद्र स्तरावर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची रूपरेषा तयार करण्यावर मंथन सुरू आहे.

4: योगींची इमेज सुधारण्याचे काम
उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपची सत्ता पुन्हा आणण्यासाठी संघाचा प्लॅन तयार आहे. गट प्रमुख पदांसाठी लागू करण्यात आलेला संघाचा फॉर्मुला विधानसभा निवडणुकीत लागू केला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे. यात अनेक आमदारांचे तिकीट कापले जाईल. त्यातील काहींच्या पत्नी आणि जवळच्या व्यक्तींना तिकीट देऊन खुश करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. तिकीट वाटपापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इमेज सुधारण्याचे काम सुद्धा संघाकडून केले जाणार आहे. योगी आणि केंद्रात मतभेद नाहीत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न संघाचे कार्यकर्ते करतील.

5: कोरोनाची तिसरी लाट
देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास काय करावे यावर संघाचे प्लॅनिंग तयार आहे. अशात संघ खूप सक्रीय दिसेल. विविध प्रचारकांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर प्लॅनिंग मागवण्यात आली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा संघाचे कार्यकर्ते प्रत्यक्षा ग्राउंडवर काम करताना का दिसले नाहीत? संघाच्या कामांचे कौतुक का झाले नाही? असा सवाल त्यांना करण्यात आला. आता कोरोनाची तिसरी लाट आल्यास संघाच्या सेवा कार्याची चर्चा व्हावी अशी ताकीद सर्वांना देण्यात आली आहे. गावो-गावी जाऊन जनजागृती करण्याचे सुद्धा नियोजन आहे. पण, यावर अंतिम प्लॅन तयार झालेला नाही.

इमेजवर दुविधा स्थिती, शाखा अनलॉक करण्यावर विचार
संघाच्या इमेजबद्दल अजुनही दुविधा आहे. यासोबतच, धर्म परिवर्तन आणि लोकसंख्या नियंत्रणावर सर्वाधिक चर्चा होत आहे. कोरोना काळात लागलेल्या निर्बंधांनंतर संघाच्या शाखा पुन्हा सुरू करण्यावर विचार सुरू आहेत. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल पाहता संघाच्या शाखा बंद असल्याने नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शाखा सुरू करण्यासाठी गाइडलाइन्सवर सुद्धा विचार केला जात आहे.

पाच दिवसीय बैठक, 50 लोकांचा प्रत्यक्ष, 250 जणांचा व्हर्चुल सहभाग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचारक बैठकीत 9-10 जुलै रोजी 11 क्षेत्रांचे प्रचारक सामिल झाले. 12 जुलै रोजी देशभरातील 45 प्रांतांच्या प्रचारक आणि सह प्रांत प्रचारकांनी सहभाग घेतला. एकूणच 50 ते 55 प्रचारकांनी या प्रत्यक्ष तर 250 लोकांनी व्हर्चुअल हजेरी लावली आहे.

बातम्या आणखी आहेत...