आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • RSS Volunteers Helping Local People After The Glacier Breaks In Uttarakhand? Know The Truth Of This Viral Post

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक न्यूज एक्सपोज:उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर RSS चे स्वयंसेवक करत आहेत लोकांची मदत? जाणून घ्या व्हायरल पोस्टचे सत्य

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही पोस्ट अॅक्टर आणि नंतर राजकारणी बनलेल्या परेश रावल यांनीही सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

काय होत आहे व्हायरल : भाजप प्रवक्ते आर पी सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये RSS च्या स्वयंसेवकांचा फोटो आहे. ज्यामध्ये ते पर्वतांवर पोते घेऊन जाताना दिसत आहेत. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'चमोली तपोवनच्या जवळपास 13 गावांचे अवशेष उरले आहेत, पूल वाहून गेले आहेत. रस्ताही वाहून गेला आहे, अशा वेळी स्वयंसेवक अन्नधान्य खांद्यावर घेऊन जात आहे. जेणेकरुन कुणीही उपाशी झोपणार नाही आणि आजाराने मरणार नाही.'

ही पोस्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर शेअर केली जात आहे.

ही पोस्ट अॅक्टर आणि नंतर राजकारणी बनलेल्या परेश रावल यांनीही सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

आणि सत्य काय आहे?
व्हायरल पोस्टमधील फोटो मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही हा फोटो गूगलवर रिव्हर्स सर्च केला. सर्च रिजल्टमध्ये हा फोटो एका न्यूज वेबसाइटवर बातमीसह सापडला.
बातमीनुसार, हा फोटो उत्तराखंडचा आहे, 2013 मध्ये हा फोटो पब्लिश करण्यात आला होता. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरादरम्यान RSS चे स्वयंसेवकांनी अेक ठिकाणी कँप लावून पर्यटक आणि स्थानिक लोकांची मदत केली होती.

  • सोशल मीडियावर RSS च्या स्वयंसेवकांचा व्हायरल होत असलेला फोटो 2013 चा आहे. जो नुकता ग्लेशियर तुटल्याच्या घटनेशी जोडून व्हायरल केला जात आहे.
  • 7 फेब्रुवारी 2021 ला उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये हिमकडा कोसळला होता. ज्यानंतर NDRF आणि SDRF ची टीम घटनास्थळी टनलमध्ये अडकलेल्या लोकांचे बचावकार्य करत आहे.