आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसचे नवीन रुप (म्यूटेशन)समोर आल्यानंतर भारताने UK वरुन येणाऱ्यांसाठी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) जारी केली आहे. याअंतर्गत आज रात्री 12 वाजेपर्यंत UK वरुन येणाऱ्यांना विमानतळावर RT-PCR चाचणी करणे गरेजेच असेल. जर त्यांच्या शरीरात कोरोनाचे नवीन रुप आढळले, तर त्यांना सेपरेट आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.
सरकारने सोमवारी UK वरुन येणाऱ्या विमानांना 23 ते 31 डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी 22 डिसेंबरच्या रात्री 11.59 वाजेपासून 31 डिसेंबरच्या 11.59 पर्यंत असेल.
आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पालन करावे लागेल
या नवीन SOP अंतर्गत राज्य सरकारांना नवीन आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवावी लागेल. जर, राज्यात UK वरुन एखादा व्यक्ती आला, तर त्याची RT-PCR चाचणी करणे गरजेची असेल.
पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीला इंस्टीट्यूशनल आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये राहावे लागेल. यात राज्यांच्या हेल्थ अथॉरिटीला नजर ठेवावी लागेल. तसेच, अशा व्यक्तींचे सँपल पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी किंवा एखाद्या खासगी लॅबमध्ये न्यावे लागतील.
चाचणीत सध्याचा व्हायरस (SARS-CoV-2)आढळला, तर सामान्य प्रोटोकॉल म्हणजेच, होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. पण, जर चाचणीत नवीन स्ट्रेन आढळला, तर सेपरेट आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. त्या व्यक्तीवर ट्रीटमेंटही त्याच प्रोटोकॉल अंतर्गत होईल.
विमानतळावर निगेटीव्ह आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला जाईल. विमान कंपन्यांना सर्व पॅसेंजरला विमानात चेक-इन करण्यापूर्वी सर्व एसओपीची माहिती द्यावी लागेल. RT-PCR चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहणाऱ्या व्यक्तींना विमानतळावरच आयसोलेशनची सुविधा केली जाईल.
व्हायरसचे नवे रुप आधीपेक्षा 70 % जास्त धोकादायक असू शकते
व्हायरसमध्ये सतत म्यूटेशन होत असतं, म्हणजेच त्याचे गुण बदलत असतात. म्यूटेशन झाल्यानंतर अनेक वेरिएंट आपोआप नष्ट होतात. पण काही केसमध्ये हे अधिपेक्षा जास्त धोकादायक बनू शकतात. ही प्रोसेस खूप वेगाने होते. त्यामुळे, शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, कोरोना व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन आधीपेक्षा जास्त धोकादायक असू शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.