आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलवान चकमक:भारतीय जवानांच्या रुद्रावतारामुळे चिनी सैनिकांची उडाली घाबरगुंडी, चीनच्या ताब्यातून सुटलेल्या १० जवानांचा खुलासा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनची कबुली : त्या धुमश्चक्रीत 20 पेक्षा कमी सैनिक गमावले

लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला उडालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांचा रुद्रावतार पाहून चिनी सैनिक गर्भगळीत झाले होते. बदला घेण्यासाठी भारतीय सैनिक मोठ्या संख्येने आले तर काय होईल, या विचाराने त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.

सुमारे ६० तास चिनी लष्कराच्या ताब्यात राहून परतलेल्या भारतीय लष्कराच्या दहा अधिकारी-जवानांच्या माहितीतून (डीब्रीफिंग) हा खुलासा झाला. सुटून आलेल्यांत २ मेजर व २ कॅप्टनचा समावेश आहे. डीब्रीफिंग दस्तऐवजांनुसार, चीनच्या तुलनेत भारतीय सैनिक अत्यल्प व नि:शस्त्र होते. पेट्रोल पॉइंट १४ वरील धुमश्चक्रीत भारतीय जवानांनी चिनी सैनिकांकडील काटेरी कुंपण गुंडाळलेले दंडुके-रॉड हिसकावून त्यांनाच चोपून काढले. यात चीनचे २० अधिकारी व सैनिक ठार झाले.

भारत-चीन लष्करात १२ तास चालली बैठक

भारत-चीनमध्ये सोमवारी लेफ्टनंट जनरल पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक झाली. चीनच्या मोल्डोत सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली ही बैठक १२ तास चालली. रात्री उशिरांपर्यंत त्याचा तपशील मिळाला नव्हता. सूत्रांनुसार, उभय देशांत मंगळवारीही बैठक घेतली जाऊ शकते.

चीनची कबुली : त्या धुमश्चक्रीत 20 पेक्षा कमी सैनिक गमावले

१५ जूनच्या चकमकीत २० पेक्षा कमी सैनिक गमावल्याची कबुली चीनने दिली. यात एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राने सोमवारी म्हटले की, सीमेवर संघर्ष वाढू नये म्हणून मृतांची संख्या जाहीर केली जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...