आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Run A Free Vaccination Campaign Across The Country, Give Rs 6,000 Monthly To The Unemployed,Opposition Letter To PM

विरोधकांचे पंतप्रधानांना पत्र:देशभर मोफत लसीकरण मोहीम राबवा, बेरोजगारांना मासिक 6 हजार रुपये द्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 9 मागण्यांचे खुले पत्र 12 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. या खुल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह १२ विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही यात आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही काही सल्ले दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे परिणाम आता देश भोगत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विरोधी पक्षांच्या मागण्या

 • देशांतर्गत किंवा विदेशातून शक्य तेथून लस खरेदी करण्यात यावी.
 • संपूर्ण देशात मोफत लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करण्यात यावी.
 • देशांतर्गत लसनिर्मितीसाठी परवाना बंधनकारक करण्यात यावा.
 • लसीसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.
 • सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर बंदी आणावी. यासाठी वापरला जाणारा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरावा.
 • पंतप्रधान निधीसह इतर सर्व खासगी निधीतील पैसा वैद्यकीय उपचारांसाठी, उपकरणांसाठी वापरावा.
 • बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये देण्यात यावेत.
 • सर्व गरजूंना मोफत धान्य पुरवावे.
 • कृषी कायदे मागे घ्यावेत. जेणेकरून महामारीत फटका बसलेले लाखो शेतकरी देशातील जनतेसाठी अन्नधान्य उत्पादन करू शकतील.
 • १२ विरोधी पक्षांची पंतप्रधानांकडे मागणी, निधीच्या वापराबाबतही केल्या सूचना
बातम्या आणखी आहेत...