आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्‍हणाले:देश चालवणे जास्त परिश्रमाचे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार बनवण्याच्या तुलनेत देश चालवणे जास्त परिश्रमाचे काम आहे. आम्ही सर्वांनी देश घडवण्याचा मार्ग निवडला आहे. म्हणूनच देशासमोरील वर्तमानातील तसेच भविष्यातील समस्या सोडवण्यावर आमचा भर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गोव्याच्या पणजीत ‘हर घर जल उत्सव’ कार्यक्रमात शुक्रवारी मोदींनी मार्गदर्शन केले.

मोदींनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंह शेखावत व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही उपस्थिती होती. प्रत्येक घरात जाणाऱ्या पाणी व्यवस्थेला आता प्रमाणित करण्यात आले आहे. अशा प्रकारची व्यवस्था करणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे, असे मोदींनी सांगितले. आता देशाच्या ग्रामीण भागातील १० कोटी नागरिकांना पाणी व्यवस्थेचा लाभ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...