आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fee Waived On UPI With Rupay Credit Card, No Charges Will Be Levied On Transactions Up To Rs 2,000.

रुपे क्रेडिट कार्डचे UPI वर शुल्क माफ:2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

RuPay क्रेडिट कार्डवरून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की RBI च्या निर्देशानुसार ही सूट RuPay क्रेडिट कार्ड धारकांना देण्यात आली आहे.

NPC ने म्हटले आहे की, रुपे क्रेडिट कार्डवरील 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर शून्य व्यापारी सवलत दर (MDR) आकारला जाईल. MDR म्हणजे एखादा व्यापारी हा कोणत्याही बॅंकेला क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी बँकेला पैसे भरतो. MDR व्यवहाराच्या रकमेच्या आधारावर आकारला जातो.

भारताचे आहे रुपे कार्ड

रुपे हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) लाँच केलेले घरगुती प्लास्टिक कार्ड आहे. देशातील पेमेंट सिस्टीम एकत्रित करणे हा त्याचा उद्देश आहे. देशातील सर्व प्रमुख बँका RuPay डेबिट कार्ड जारी करतात.

हे इतर कार्ड्स (युरो पे, मास्टरकार्ड, व्हिसा) सारखेच आहे आणि सर्व भारतीय बँका, एटीएम, पीओएस टर्मिनल किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर सहजतेने चालते. रूपे कार्ड्समध्ये ट्रांझॅक्शन कॉस्ट कमी आहे आणि जलद प्रक्रिया आहे कारण ती देशातच प्रक्रिया केली जातात. सध्या भारतात 1,236 बँका RuPay कार्ड जारी करतात.

21 सप्टेंबरपासून उपलब्ध होती UPI शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची सुविधा

ग्लोबल फिन्टेक फेस्टिव्हलमध्ये गेल्या महिन्यात म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले. यापूर्वी, केवळ डेबिट कार्ड आणि खाती UPI नेटवर्कशी जोडली जाऊ शकत होती. सध्या पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या तीन बँकांनी ही सुविधा दिली आहे.

गूगल पे वरून क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे पेमेंट कसे करावे

तुम्हाला पहिल्यांदा कार्ड ला UPI अ‍ॅपसोबत जोडावे लागेल. गूगल पे वेबसाइटनुसार, वापरकर्ते अ‍ॅपवरून बँकांचे डेबिट, क्रेडिट कार्ड जोडू शकतात.

सप्टेंबरमध्ये UPI द्वारे 11 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले

NPCI द्वारे UPI पेमेंटच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये देशात UPI द्वारे एकूण 11.16 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हा आकडा ऑगस्टच्या तुलनेत जास्त आहे. ऑगस्टमध्ये UPI च्या माध्यमातून एकूण 10.72 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

सप्टेंबर 2022 मध्ये, एकूण 768 कोटी, म्हणजे 7.68 अब्ज वेळा, UPI द्वारे पैशांचा व्यवहार झाला. त्याच वेळी, ऑगस्टमध्ये 657 कोटी म्हणजेच 6.57 अब्ज पट UPI पेमेंट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...